मुंबई : दादर चैत्यभूमी दि.६/१२/२४ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ वा महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी येत असतात.

त्यातच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा शपथ विधी झाल्यानंतर चैत्यभुमी (मुंबई) येथे महामानव, भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख मा.संजयभैय्या सोनवणे, आमदार प्रविण दरेकर, आमदार अमोल मेटकरी, आमदार संजय बनसोडे, मा.खा. राहुल शेवाळे, मा.खा.अमर साबळे, आमदार राजकुमार बडोले व इतर मान्यवरांच्या हस्ते अभिवादण करण्यात आले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा