शिक्षण
अण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड क्लब अंतर्गत पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन स्पर्धेचे आयोजन..

सुनिल थोरात (हवेली)
पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बी आय एस ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड क्लब अंतर्गत पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
वस्तूची गुणवत्ता तसेच त्याचे प्रमाणीकरण करणारी भारतीय मानक संस्था ग्राहकांप्रती फसवणूक होऊ नये म्हणून जाणीव जागृती करते तसेच उच्च गुणवत्ता असणाऱ्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मानकीकरण व प्रमाणीकरण करते.
स्टॅंडर्ड क्लबच्या ८५ विद्यार्थ्यांनी यावेळी विविध विषयांवर पोस्टर्स सादर करून स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.
सदर स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश परदेशी यांच्या हस्ते झाले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे तसेच उपप्राचार्य विलास शिंदे डॉ. लतेश निकम उपस्थित होते
डॉ. सतीश परदेशी यांनी विद्यार्थी करत असलेल्या जाणीव जागृती बाबत तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर्स बाबत सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी बी आय एस पुणे ब्रांच ऑफिस कडून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या स्टॅंडर्ड बुकलेटचे प्रदर्शन मांडण्यात आले. गार्गी नांगरे तसेच शुभम मस्तूद या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी स्टॅंडर्ड रायटिंग स्पर्धेतील गार्गी नांगरे हितल चौधरी प्रथम क्रमांक पायल रोटे श्रावणी लटके द्वितीय क्रमांक शुभम मस्तूद रितेश शर्मा तृतीय क्रमांक ईशा आखाडे श्रावणी मशाखेत्री उत्तेजनार्थ क्रमांक या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. आयोजित केलेल्या पोस्ट मेकिंग कॉम्पिटिशन मध्ये गार्गी नांगरे व हितल चौधरी प्रथम क्रमांक अर्पिता खंडागळे केतकी देसाई आर्या चौधरी द्वितीय क्रमांक प्रतीक्षा जोगदंड साक्षी हिरेमठ स्नेहल चव्हाण तृतीय क्रमांक व अभिया बत्तीसे व प्रज्ञा गायकवाड उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन बी आय एस च्या स्टॅंडर्ड क्लबच्या मार्गदर्शिका सौ मंजुषा भोसले यांनी केले सहसंयोजन प्रीती राठोर यांनी केले याप्रसंगी जयश्री अकोलकर प्रीती राठोड राऊत एस सी प्रताप बामणे संध्याराणी गावडे अर्चना जाधव चौरे मॅडम उपस्थित होते.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
👉🏻”द पाॅईंट न्युज 24″- https://thepointnews24.in/
👉🏻फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
👉🏻ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
👉🏻इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
👉🏻डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24
👉🏻वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj लिंकवर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.



