नागपूर : नागपूरमध्ये रविवारी (१५ डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.
महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनदेखील सुरू होणार आहे, त्यामुळे नागपूर येथे मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्याचं समजतं. १९९१ नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला.
‘या’ मंत्र्यांचा ‘पत्ता कट’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राउंडवर नवनिर्वाचित सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा पार पडला आहे. एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या अनेक मंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण नसणार आहेत. तर एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेलं नाही.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार केला तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही.
कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणारे नेते
नागपूरमधील या शपथविधी कार्यक्रमात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राषट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षाच्या ३३ नेत्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा