शिक्षण

साधना विद्यालयात ५२ वे शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू ; हडपसर

पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) , पुणे शहर मुख्याध्यापक संघ, पुणे शहर विज्ञान व गणित अध्यापक संघ, साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेज व चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालय हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील पुणे शहर पूर्व – पश्चिम विभाग, तालुका पातळीवरील विज्ञान प्रदर्शन साधना विद्यालयात (दि.१९) डिसेंबर रोजी सुरू झाले.

         शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विज्ञान प्रदर्शनाच्या मुख्य विषयावर आधारित शहरातील इयत्ता ६ वी ते १२ वीच्या सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक, प्रयोगशाळा परिचर व सहाय्यक यांची शैक्षणिक उपकरणे व साधन निर्मिती यांचा सहभाग आहे. विविध शाळांतील सुमारे ३०० उपकरणांचा यात सहभाग होता.

          विज्ञान प्रदर्शनाचे उद्गघाटन माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी डाॅ.भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी धनंजय धानापुणे, शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे संपर्क अधिकारी अर्चना नलवडे, माध्यमिक व उच्च माध्यमिक राज्य मुख्याध्यापक संघ सचिव नंदकुमार सागर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य अरविंद भाऊ तुपे,साधना विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव, कन्या विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल तुळजापुरे, समग्र शिक्षणच्या अश्विनी ननवरे, पुणे शहर मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शिवाजी शिंदे, विज्ञान अध्यापक संघ पुणे शहर पश्चिम विभाग अध्यक्ष संजय भामरे, विज्ञान अध्यापक संघ जिल्हाध्यक्ष रोहिदास एकाड, माजी सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार, आर्यनमॅन डाॅ.शंतनू जगदाळे, आजीव सभासद लालासाहेब खलाटे,सर्व शाखांचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

          उद्घाटन समारंभानंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे व प्रकल्पांचे अवलोकन करून वि‌द्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

           आपले सगळे जीवन हे विज्ञानावर अवलंबून असून विज्ञानाची भूमिका अतिशय मोलाची आहे.या प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागेल आणि त्यांना अधिक रस निर्माण होईल, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डाॅ.भाऊसाहेब कारेकर यांनी केले.

          शुक्रवार २० डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या विज्ञान प्रदर्शनात सर्व शाळांमधील वि‌द्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. त्यांच्या प्रयोगांचे व प्रकल्पांचे परीक्षण, परीक्षक करणार आहेत. उत्कृष्ट प्रयोगांना जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभागाकडून बक्षीसे दिली जाणार आहेत.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले. सूत्रसंचालन अनिल वाव्हळ, रूपाली सोनावळे व सविता पाषाणकर यांनी केले तर आभार शिवाजी मोहिते यांनी मानले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??