जिल्हासामाजिक

स्थानिक तक्रार समितीकरीता ३१ डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक (प्रतिबंध, मनाई व निवारण) कायदा, 2013 अंतर्गत स्थानिक तक्रार समितीवरील अध्यक्षा व सदस्य पदांवरील नियुक्तीबाबतचे निकष निश्चित करण्यात आले असून इच्छूकांनी त्यांचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

         स्थानिक तक्रार समितीमध्ये १ अध्यक्ष आणि २ सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. अध्यक्ष या पदाकरीता सामाजिक कार्याचा ५ वर्षांचा अनुभव असलेल्या आणि महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या महिला असावी. सदस्य पदाकरीता महिलांच्या सोयीसाठी बांधील असलेल्या अशा अशासकीय संस्था, संघटना किंवा लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचित असलेली व्यक्ती असावी. या दोन सदस्यांपेकी एक सदस्य महिला असावी. परंतु, दोन सदस्यांपैकी एका सदस्यांना कायदयाचे ज्ञान असावे किंवा त्यांची पार्श्वभुमी ही कायद्याच्या क्षेत्रातील असावी. तसेच एक सदस्य अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा इतर मागास वर्ग किंवा अल्पसंख्यांक समाजातील महिला असावी.

         “लैंगिक छळाच्या प्रश्नांशी परिचीत असलेली व्यक्तीमध्ये “समाजिक कार्य” या क्षेञात महिला सक्षमीकरणास अनुकूल सामाजिक परिस्थितीच्या निर्मितीबाबत आणि विशेषत: कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत किमान ५ वर्षांचा अनुभव असलेले सामाजिक कार्यकर्ते तसेच कामगार, सेवा, दिवाणी किंवा फौजदारी कायद्यांशी परिचित असलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.

         इच्छुकांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 29/2, गुलमर्ग पार्क कोऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी, तिसरा मजला, जाधव बेकर्स जवळ, सोमवार पेठ, पुणे 411011 तसेच lcpune2021@gmail.com या ईमेल पत्त्यावर ९९६०७७४८५७ भ्रमणध्वनी क्रमाकांवर सपंर्क साधावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर यांनी केले आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??