राजकीय

संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळावर कॉन्ट्रॅक्टरला अजित पवार यांचा सज्जड दम..

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आपली कार्यपद्धती, बिनधास्तपणा आणि सडेतोड बोलण्यामुळे ओळखले जातात. अजित पवार कोणाची मुलाहिजा ठेवत नाही.

        उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळावर विकास कामांची पाहणी केली. कामे लवकर पूर्ण होत नसल्याने अजित पवारांनी कॉन्ट्रॅक्टरला बोलवून खडे बोल सुनावले

          अजित पवारांनी पाहणी दरम्यान संभाजी महाराज माझे दैवत आहे. जमत नसेल तर मुकाट्याने काम सोडून दे… नाहीतर साऱ्या गावाला सांगतो याच्याने काम होणार नाही. तू दुसरं कुठलं काम बघ, तू काम करू शकत नाही. या भानगडीत पडू नको. आमच्या सगळ्याचा भावनिक प्रश्न आहे. काहीच काम झाले नाही,
असा सज्जड दम भरला..

जगाला हेवा वाटेल असं स्थळ बनवा : अजित पवार

       तुळापूर येथील स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल तसेच जगाला हेवा वाटेल अशा स्वरूपात उभारण्यात यावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

दर्जेदार साहित्याचा वापर करा : अजित पवार

         अजित पवार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकासकामे करताना ऐतिहासिक दृश्यस्वरुपातील आणि दर्जेदार साहित्याचा वापर करावा. विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यावे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. विकासकामे करताना दगडी कातीव, कोरीव बांधकाम, मातीच्या वैविध्यपूर्ण विटा आदींचा वापर करत बांधकामाला मजबुती येईल अशा पद्धतींचा अवलंब करावा.

परिसरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे: अजित पवार

        नदीच्या कडेला बांधकाम करताना नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही यासाठी सर्व पर्यावरणाच्या नियमांचे पालन करावे; तसेच नदीच्या अनुषंगाने लाल रेषा, निळी रेषाबाबतच्या अटींचे काटेकोर पालन करावे. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??