वायरल : मोहम्मद शमी व सानिया मिर्झा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमुळे चर्चेत आहेत. दोघेही दुबईत एकत्र वेळ घालवत असल्याचा दावा एका फेसबुक पेजवर करण्यात आला आहे.
पेजवर त्याची छायाचित्रे शेअर करण्यात आली होती, ज्यामध्ये ते समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दाखवण्यात आला होता. त्यांचे फोटो शेअर करून त्यांचे अभिनंदनही करण्यात येत आहे. या दाव्यामुळे सोशल मिडिया वर चर्चेला उधाण आले आहे. या फोटोंवर चाहते वेगवेगळ्या सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत.
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चाहत्यांमध्ये चर्चा होत असते.
सानियाने नुकताच शोएब मलिकपासून घटस्फोट घेतला, तर शमी पत्नी हसीन जहाँसोबतच्या कायदेशीर वादामुळे चर्चेत राहिला. या संदर्भात त्याचे व्हायरल झालेले फोटो चाहत्यांसाठी धक्कादायक किंवा आनंदायीक होते.
एका फेसबुक पेजने सानिया आणि शमीचे एकत्र फोटो शेअर केले आहेत. हे दोघेही दुबईत असल्याचा दावा या पेजने केला आहे.
फोटोंमध्ये सानिया आणि शमी बीचवर दिसत आहेत. या छायाचित्रांमुळे चाहते गोंधळले आणि काहींनी त्यांच्यावर टीका टिप्पणी सुद्धा केली.
मात्र सदर चित्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने बनवण्यात आल्याचे अखेर समोर आले आहे. मोहम्मद शमीने स्वतः इंस्टाग्रामवर एक दिवसापूर्वी त्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये सराव करत होता. हे चित्र AI टूल्स सामी – सानिया in दुबई वापरून तयार केल्याचे तथ्य तपासणीत समोर आले. याआधीही शमी आणि सानियाबद्दल अशाच अफवा पसरवण्यात आल्या होत्या.
दोघांनीही या दाव्यांची पुष्टी केली नाही.
सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी यांनी बनावट छायाचित्रांवर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. तथापि, फॅक्ट चेकने पुष्टी केली की दोघेही सध्या आपापल्या ठिकाणी आहेत आणि दुबईमध्ये नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही बातम्यांची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये, हे या प्रकरणावरून पुन्हा एकदा दिसून येते. खोट्या बातम्या टाळता याव्यात यासाठी तथ्य तपासणे महत्त्वाचे आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा