लग्नापूर्वी संबंध ठेवण्यास नकार, होणाऱ्या पतीकडूनच तरुणीवर बलात्कार करून निर्घृण हत्या ; धक्कादायक घटना…

पालघर : पालघर जिल्ह्यातील एका गावात घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे एका तरुणीची तिच्याच होणाऱ्या पतीने निर्घृण हत्या केली आहे. यापूर्वी आरोपीने तिच्यावर बलात्कार केल्याचेही उघड झाले आहे.
बुधवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. मृतक तरुणीचे आई-वडील शेतात गेले असताना तिचा होणारा पती घरात शिरला. तरुणी एकटी असल्याचे पाहून त्याने तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, लग्नापूर्वी संबंध ठेवण्यास तिने नकार दिला. नकार मिळाल्याने संतापलेल्या आरोपीने आधी तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली.
यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आणि जवळच्या जंगलात लपला. संध्याकाळच्या सुमारास घरी परतलेल्या आई-वडिलांच्या नजरेस मुलगी मृतावस्थेत दिसली. त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
मृतक तरुणीच्या आई-वडिलांनी संशय व्यक्त करत होणाऱ्या पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून कसून चौकशी सुरू आहे. या निर्घृण घटनेमुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
Editer sunil thorat



