नाशिक : ग्राहक पंचायत महाराष्ट्र, नाशिक महानगर येथे राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हुतात्मा स्मारक, नाशिक येथे झालेल्या कार्यक्रम नाशिक विभागाचे कोषाध्यक्ष अँड. राजेंद्र खंदारे व नाशिक विभागाचे सहसंघटक अँड. सुरेन्द्र सोनवणे, प्रशांत देशमुख यांच्या उपस्थित संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. राजेंद्र खंदारे व अँड. सुरेन्द्र सोनवणे यांच्या हस्ते ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अँड. राजेंद्र खंदारे यांनी ग्राहक दिनाच्या आयोजना बाबत सविस्तर माहिती देवून ग्राहकांचे हक्क, कर्तव्य. बाबत माहिती दिली. खरेदी करतांना काळजी कशी घ्यावी, ग्राहकांची फसवणूक कशी केली जाते. याबाबत माहिती दिली. ग्राहकांच्या उदासीनतेमुळे अजूनही आवश्यक तेवढी जागृती झाली नसल्याने फसवणुकीचे प्रकार सुरू असून त्यामध्ये वाढ होत आहे. असेही उपस्थिताना सांगितले.
नाशिक विभाग सहसंघटक अँड. सुरेन्द्र सोनवणे यांनी ग्राहक चळवळ व ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या कार्याबाबत माहिती देवून ग्राहक संरक्षण कायदा मधील महत्वाच्या तरतुदी बाबत माहिती दिली. ग्राहकांच्या फसवणुकी बरोबर बदलत्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करून होणाऱ्या फसवणुकीचे स्वरूप हे बदलत असून त्यातून मोठ्या प्रमाणात ग्राहकांना आर्थिक नुकसान व मनस्ताप होत आहे. यामुळे ऑनलाइन बँकिंग, मोबाईल द्वारे होणारे फसवणुकीचे प्रकार, मोठ्या आर्थिक प्रलोभनाच्या आडून गुंतवणुकाच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी व यातील धोके कमी होण्यासाठी नागरिकांना सजग बनवणे आवश्यक आहे. फसव्या जाहिरातींना बळी न पडता एक जागरूक ग्राहक बनून कशी खरेदी करावी व फसवणूक झाल्यास काय करावे याबाबत मार्गदर्शन केले.
प्रशांत देशमुख यांनी ग्राहकाची फसवणूक झाल्यास ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी आयोगात तक्रार कशी दाखल करावी याबाबत मार्गदर्शन केले. पुढील काळात ग्राहक पंचायत महाराष्ट्र च्या वतीने वेगवेगळ्या माध्यमातून जागृती करण्याचे प्रयत्न केले जातील असे सांगितले. राजेंद्र नानकर यांनी माहिती अधिकार कायदा बाबत मार्गदर्शन केले. विठोबा द्यानद्यन यांनी टोकडे गावातील रस्ता हरवल्या बाबतच्या त्यांच्या प्रकरणा बाबत माहिती उपस्थितांना दिली.
संतोष गायकवाड यांनी वैद्यकीय क्षेत्र संदर्भात नागरिकांना येत असलेल्या समस्या व होणारी फसवणुकीबाबत माहिती दिली. हरीश वाघ यांनी शैक्षणीक क्षेत्राबाबत विध्यार्थी व पालकांना येणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत सविस्तर माहिती दिली. नवीन गंगावणे यांनी ग्राहकांना येणाऱ्या समस्या व मध्यस्त कक्ष याबाबत मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद अहिरे यांनी केले व आभार प्रदर्शन महेश परदेशी यांनी केले. या कार्यक्रमास नाशिक विभागाचे कोषाध्यक्ष अँड. राजेंद्र खंदारे व नाशिक विभागाचे सहसंघटक अँड. सुरेन्द्र सोनवणे, प्रशांत देशमुख, अँड. राजेंद्र शेवाळे, अँड. हेमंत दाते, स्वप्नील गोवर्धने, संतोष गायकवाड, राजेंद्र नानकर, विठोबा द्यानद्यन, हरीश वाघ, विनोद अहिरे, महेश परदेशी, दिलीप निकम, संतोष जाधव, भाऊराव बच्छाव, विशाखा शेवाळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा