पुणे (हडपसर) : थोर समाजसुधारक, विचारवंत, लेखक, महात्मा जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षण, अस्पृश्य उद्धार आणि समाजसुधारणेचा वसा घेतला होता.
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून त्यांनी शिक्षणाचे बहुमोल कार्य केले.सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाच्या जनक होत्या असे प्रतिपादन साधना विद्यालय व आर.आर.शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव यांनी केले.
साधना विद्यालय व आर आर शिंदे ज्युनिअर कॉलेज हडपसर येथे सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त
आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यालयातील कलाशिक्षिका चित्रा हेंद्रे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर गीत सादर केले. त्यानंतर सुदर्शन होनराव, ओम नवले, श्रीनिवास ठोंबरे
या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रेखा जाधव यांनी शिक्षक मनोगतात सावित्रीबाई फुले यांच्या समग्र जीवनकार्याचा आढावा घेतला.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, माधुरी राऊत, आजीव सेवक अनिल मेमाणे, ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे, धनाजी सावंत, गजेंद्र शिंदे, सांस्कृतिक विभागप्रमुख सविता पाषाणकर सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश लोहकरे, सूत्रसंचालन कमल मोरमारे, व आभार वैशाली देवमाने यांनी मानले.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा