महाराष्ट्रसामाजिक

आता एसटीचे लोकेशन कळणार, महामंडळाचा प्लॅन? सविस्तर माहिती वाचा..

मुंबई : एसटी’ महामंडळाने रेल्वे प्रशासनाच्या धर्तीवर प्रवाशांच्या सोयीसाठी ऑनलाईन ‘व्हीटीएस’ यंत्रणा विकसित केली आहे. या यंत्रणेचा वापर करून एसटीच्या १६,००० हून अधिक बसांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे, ज्यात नवीन आणि जुनी दोन्ही प्रकारातील बसांचा समावेश आहे.

या यंत्रणेच्या विविध पातळ्यांवर चाचण्या घेण्यात आल्या आणि समोर आलेल्या तांत्रिक त्रुटी दूर केल्या गेल्या आहेत. याबरोबरच, प्रायोगिक तत्त्वावर या यंत्रणेची चाचणी यशस्वी ठरली आहे. अॅप विकसित करण्याचे काम देखील सुरू आहे.

                   असा होणार फायदा

जसे रेल्वे प्रवाशांना त्यांच्या गाडीचे स्थान कळते, तशाच प्रकारे ‘व्हीटीएस’ यंत्रणेमुळे आता प्रवाशांना आरक्षित किंवा अपेक्षित बसची माहिती एका क्लिकवर मिळू शकणार आहे. यामध्ये बस कोठे आहे, किती अंतरावर आहे, बस बिघडली आहे का नाही, किती विलंब होईल, या सर्व गोष्टी सहजपणे समजणार आहेत.

ग्रामीण भागातील रस्ते आणि इंटरनेटचे महत्त्व

‘एसटी’ महामंडळाच्या बस शहरी भागांपासून ते ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यांपर्यंत प्रवास करतात. व्हीटीएस यंत्रणा योग्य प्रकारे कार्यरत राहण्यासाठी खेड्यांतील रस्ते आणि इंटरनेट सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

येथे प्रवाशांना करावा लागेल अडचणींचा सामना

खडतर रस्त्यांमुळे यंत्रणेमध्ये बिघाड होऊ शकतो, ज्याची दुरुस्ती करून ‘व्हीटीएस’ आणि जीपीएस यंत्रणा साचेबद्ध करण्यात आली आहे. तसेच, डोंगराळ प्रदेश, घाट, पठार आणि बोगद्यांमध्ये इंटरनेटची सुविधा अनेकदा नसते, ज्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागेल.

लवकरच प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध होईल – प्रमोद नेहूल

राज्यभरातील १६,००० हून अधिक बसांमध्ये जीपीएस आणि आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. पुणे विभागातील ८५० बसेसमध्ये देखील या यंत्रणेसाठी आवश्यक सर्व सुधारणा करण्यात आल्या आहेत. चाचणी आणि त्रुटी दूर करण्याचे काम सुरू असून, लवकरच प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध होईल. यामुळे प्रतिक्षेचा कालावधी आणि अन्य माहिती प्रवाशांना मोबाइलद्वारे मिळू शकेल. अशी माहिती पुणे एमएसआरटीसीचे विभागीय नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??