
पुणे (हडपसर) : शैक्षणिक गुणवत्तेचा उच्चांक प्रस्थापित करत जे. एस. पी. एम. जयवंतराव सावंत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, हडपसर पुणे या संस्थेने पुन्हा एकदा उत्कृष्टतेचा मान मिळवला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन, मुंबई (एम.एस.बी.टी.ई.) यांच्या तज्ज्ञ समितीने मार्च 2025 मध्ये केलेल्या पाहणीत या महाविद्यालयाच्या डी. फार्मसी विभागाला 2024–25 या शैक्षणिक वर्षासाठी सलग दुसऱ्या वर्षी “सर्वोत्कृष्ट महाविद्यालय” (Excellent) हा दर्जा प्रदान केला.
मागील वर्षी मिळाला होता मानाचा दर्जा…
या संस्थेला याआधीही 2023–24 या शैक्षणिक वर्षात हाच उत्कृष्टतेचा दर्जा प्राप्त झाला होता. तोच मान टिकवून ठेवण्यात यश मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी समाधान व्यक्त करत, आगामी काळातही ही गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्याचा विश्वास व्यक्त केला.
आधुनिक सुविधा व अनुभवी शिक्षकवर्ग…
सन 2006 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेत विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षणसोबत विविध सुविधा उपलब्ध आहेत. औषध निर्मिती कंपनीतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, नियमित व्याख्याने, अनुभवी व विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देणारा शिक्षकवर्ग, सुसज्ज ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळा, आधुनिक संगणक केंद्र, वाय-फाय कॅम्पस, तसेच स्वतंत्र प्लेसमेंट सेल यामुळे महाविद्यालयाने गुणवत्ता टिकवून ठेवली आहे.
निकाल व प्लेसमेंटमध्ये उत्तुंग यश…
गेल्या शैक्षणिक वर्षी महाविद्यालयाचा निकाल तब्बल 90 टक्के लागला होता. विशेष म्हणजे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची शंभर टक्के प्लेसमेंट करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यात हे महाविद्यालय सातत्याने अग्रेसर ठरत आहे.
संस्थेचे कौतुक…
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक डॉ. तानाजीराव सावंत, हडपसर संकुल डायरेक्टर डॉ. वसंत बुगडे, डॉ. मारुती काळबांडे व प्राचार्य डॉ. प्रफुल्ल आडकर यांनी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले…
Editer sunil thorat





