
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये पर्यावरण रॅली, वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामन्य ज्ञान स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांचे उदघाटन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश घुले यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयातून मांजरीरोड – पंधरानंबर- गोंधळेनगर ते ग्लायडिंग सेंटर या मार्गे पायी पर्यावरण रॅली काढण्यात आली होती. या पर्यावरण रॅलीत हिरवे जग, सुखी जीवन! , झाडे लावा, पर्यावरण वाचवा!, पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा! , पर्यावरणाचे करा रक्षण, मुलांना द्या याचे शिक्षण! , प्रकृतीचे रक्षण, आपले कर्तव्य!, स्वच्छ हवा, निरोगी भविष्य! , कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी! असे पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती करण्यारे संदेश तसेच तसेच जागतिक वारसा स्थळ यादीत समाविष्ट झालेल्या किल्ल्यांची माहिती देणारे पोस्टर हाती घेऊन विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. या रॅलीमध्ये महाविद्यालयाची 1543 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा.अनिल जगताप, प्रा. जयश्री अकोलकर आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक श्री सुनिल थोरात





