राजकीय
पराभवानंतरही अशोक पवारांच्या अडचणी कमी होईनात, ; अजित पवार घोडगंगा कारखान्याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

पुणे (शिरूर – हवेली) : पुण्यातील साखर संकुल येथे काही सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या सोबत अजित पवारांची बैठक पार पडली आहे.
साखर आयुक्त कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालयाचे कामकाजाचा अजित पवार यांनी आज (गुरूवारी) आढावा घेतला यात हवेली तालुक्यातील दोन साखर कारखाण्याबाबत देखील बैठका घेतल्या आहेत.
हवेली तालुक्यातील दोन्ही साखर कारखाने सुरू करण्यासाठी अजित पवारांनी बैठका घेतल्याची माहिती आहे. माजी आमदार अशोक पवार यांच्याकडे असलेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा देखील समावेश आहे. तर दुसरा थेऊर येथील साखर कारखान्याबाबत बैठक पार पडल्याची माहिती आहे. शरद पवार गटाचे माजी आमदार अशोक पवारांच्या कारखान्यावर अजितदादाची प्रशासक नेमण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अजित पवारांनी शिरूरच्या घोडगंगा सहकारी कारखान्याची यावेळी बैठक लावली होती
माजी आमदार अशोक पवार यांचा मुलगा सध्या कारखान्याचा चेअरमन आहे. यावेळी बैठकीला अजित पवार गटाचे आमदार माऊली कटकेही उपस्थित होते. अजित पवार घोडगंगा बाबत नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान याआधी एनएसडीसीकडून काही कारखान्यांना कर्ज वाटप करण्यात आलं होतं, मात्र, अशोक पवारांच्या या कारखान्याला कर्ज न देता ‘एनएसडीसी’कडे (NSDC) सादर केलेल्या कर्जाच्या फाईल मध्ये त्रुटी असल्याचं सांगितलं गेलं होतं,
विधानसभा निवडणुकीत अशोक पवारांनी अजित पवारांवर कडाडून टीका देखील केली होती. मी शरद पवार यांच्यासोबत राहिलो म्हणून माझ्यावर अन्याय करणार असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, केवळ विरोधी पक्षात आहे म्हणून निधी दिला जात नाही हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी आधी म्हटलेलं होतं.
हा कारखाना सध्या बंदच आहे, विधानसभा निवडणुकीत घोडगंगा कारखाना विरोधकांनी लक्ष्य केला होता, आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येताच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोडगंगा कारखाना रडारवर घेतल्याचे आता बोलले जात आहे.
अजित पवारांनी निवडणुकीआधी केली होती टीका
अशोक पवार यांनी स्वतःचा खासगी कारखाना चांगला चालवला. पण, घोडगंगा साखर कारखाना बंद पाडला. कारखाना अडचणीत असताना आपल्या अनुभवी नवख्या मुलाच्या ताब्यात देऊन त्याला अध्यक्ष केले. शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हा कारखाना बंद पडला असल्याने संचालक मंडळाला काही दिवस देतो. त्यानंतर मात्र मी सहकारी कायद्यानुसार नोटीस काढतो. हे संचालक मंडळ कारखाना चालविण्यास सक्षम नसल्याने प्रशासकाच्या ताब्यात द्यावे लागेल. मला शेवटी सभासदांचे हित महत्त्वाचे आहे. घोडगंगा कारखान्याच्या बाबतीत जी चूक झाली ती आगामी काळात सुधारू, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
👉🏻”द पाॅईंट न्युज 24″- https://thepointnews24.in/
👉🏻फेसबुक – https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
👉🏻ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
👉🏻इन्स्टाग्राम – https://www.instagram.com
👉🏻डेलीहंट पेज – https://profile.dailyhunt.in/sunil24
👉🏻वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी – https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj लिंकवर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.



