सामाजिक

मुलाने पतंग उडवला ! आईबाप जाणार तुरुंगात, काय आहे नियम ; सविस्तर माहिती जाणून घ्या..

पुणे : कायद्याने बंदी असलेला जीवघेणा नायलॉन मांजा चोरट्या मार्गाने विक्री केला जात आहे. त्यामुळेच महापालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून सातत्याने अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाभरात कारवाई सुरूच आहे. महापालिका आणि स्थानिक पोलिसांकडून मागील १५ दिवसात अनेक ठिकाणी कारवाया केल्या असून लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. तरीही रस्त्यावर अनेक ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर करत पंतग उडवल्याचं उघडकीस आलं आहे.

पुण्यात तीन दिवसांपूर्वी नायलॉन मांजा गळ्यात अडकून गळा कापल्याने एका तरूणाला ३२ टाके पडलेत. तर कात्रजचे रहिवासी असलेले सतीश फुलारी हे १५ दिवसांपूर्वी मुलीला शाळेतून घेऊन दुपारी घरी परत चालले होते. दरम्यान, कात्रज-कोंढवा रस्त्यावर नायलॉन मांज्याने गळ्याला विळखा घातल्याने त्यांचा गळा चिरला. त्यांना तब्बल १५ टाके पडले. दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचलाय. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात पाहता, पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे.

आता अल्पवयीन मुलं नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना आढळून आली. त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे. पुणे पोलिसांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मकर संक्रांतीत आपलं मूल पतंग उडवत असेल तर तो त्यासाठी कोणता दोरा वापरतो, यावर पालकांना लक्ष ठेवावं लागणार आहे. तसं न केल्यास थेट आई वडिलांवर गुन्हे दाखल होणार आहेत. यामुळे आई वडिलांना तुरुंगात जाण्याची वेळही येऊ शकते, असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

खरं तर, महाराष्ट्रात व देशात अनेक ठिकाणी नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही अनेक ठिकाणी नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होत असल्याचं समोर येत आहे. मांजामुळे गळा कापून अनेकांना आयुष्यभराची दुखापत होत आहे. हे सगळे अपघात पाहता आता पालकांवर जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. गुन्हे शाखेच्या उपायुक्तांनी याबाबतची पोलिसांची भूमिका जाहीर केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??