जिल्हासामाजिक

रस्त्यात कुठेही थांबा! रस्ता आपलाच ट्रॅव्हल्स बस चालकांकडून वाहतुकीच्या नियमाचे सर्रास उल्लंघन…

प्रशासनाचा कारवाई कडे दुर्लक्ष ; अपघात होण्याची दाट शक्यता...जनता त्रस्त..

पुणे (हडपसर) : रस्ता आपलाच कुठेही ट्रॅव्हल्स थांबवा अन् वाहतूक कोंडी करा, असा मनमानी कारभार शहरातील विविध ठिकाणी खासगी वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्स चालकांकडून सर्रास सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत असून, त्यामुळे सर्रास वाहतूककोंडी होत आहे.

                     ..कुठे घडतात प्रकार.. 

       वर्दळीच्या पुणे-मुंबई महामार्गावर असे प्रकार सर्रास घडत असून, या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. शहरातून मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसगाड्या प्रवाशांची ने-आण करतात; मात्र या ट्रॅव्हल्सवरील चालक वाहने रस्त्यात कुठेही उभी करत असल्याने वाहतूक कोंडी उद्भवल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसून येत आहे. निगडी, तळवडे व भोसरी येथून ट्रॅव्हल्स बस ये-जा करत असतात. पुणे-मुंबई महामार्गावर मधुकर पवळे उड्डाणपूल, खंडोबा माळ, चिंचवड, बिजलीनगर, चिंतामणी चौक, अहिंसा चौक, चापेकर चौक, थेरगाव, बिर्ला हॉस्पिटल, डांगे चौक, काळेवाडी, नाशिक फाटा, फुगेवाडी आदी भागात प्रवाशांची चढ-उतार करण्यासाठी ट्रॅव्हल्स भररस्त्यात थांबविल्या जातात. पुणे सोलापूर रोड वर खाजगी ट्रॅव्हल्स यांना जागा असताना भैरोबा नाला, फातीमानगर, मगरपट्टा ब्रिज, गाडीतळ, रवी दर्शन, पंधरा नंबर लक्ष्मी कॅालनी याठिकाणी खाजगी बस रोड वर थांबून प्रवासी भरायचे काम करतात. उरुळी कांचन येथून नोकरदार पुण्यात जात असतो. येताना मात्र त्याच नोकरदाराचे हाल होतात हे नक्की. परिणामी वर्दळीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, बाचाबाची व हार्नचे कर्कश आवाज होत असतात.

        ट्रॅव्हल्स नियोजित ठिकाणी मार्गस्थ होताना प्रवासी घेण्यासाठी ट्रॅव्हल्स गाड्यांना वाहतूक विभागाद्वारे खासगी वाहतुकीसाठी शहरात पाच ‘पिकअप पॉइंट’ निश्चित केले आहेत. त्याव्यतिरिक्त अन्य कुठेही ट्रॅव्हल्स थांबविल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला होता; मात्र काही दिवसांपुरताच हा कारवाईचा फार्स करण्यात आला. काही दिवसांनंतर येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती दिसून येत आहे.

खासगी प्रवासी वाहतूक धारकांची मनमानी सुरूच असून, यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा बेशिस्त ट्रॅव्हल्स गाडी चालकांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र या सर्व प्रकाराकडे वाहतूक विभाग डोळेझाक करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

      वाहतूक विभागाने ठरवून दिलेले पिकअप पॉइंट

     पुणे- सोलापूर रोडवर लक्ष्मी कॅालनी व शेवाळेवाडी याच्या मध्ये पिकअप पाॅईंट, निगडी-भक्ती-शक्ती सर्कल, तळवडे-टॉवर लाइन, रुपीनगर, भोसरी-गावजत्रा मैदान, लांडेवाडीतील बाबर पेट्रोलपंप हे पिकअप व ड्रॉप पॉइंट निश्चित केले;

                   नोकरदार आनंद खामकर

      वाटेल त्या ठिकाणी ट्रॅव्हल्सधारक वाहने पार्क करीत प्रवासी भरतात प्रवासी भरताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करतात. त्यांच्यावर वाहतूक विभाग व आरटीओ यांचे नियंत्रण राहिले नाही. रोडवर खाजगी ट्रॅव्हल्सवर कारवाई होईल व या कारवाईतून नागरिकांना दलासा मिळेल..

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??