पुणे (हवेली) : पुर्व हवेली तालुक्याला लोणी काळभोर, कदमवकवस्ती परीसराला अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून दिवसाढवळ्या व्यवसाय तेजीत चालू आहे. लोणी काळभोर, कदमवकवस्ती परिसरात अंमली पदार्थ, दारु धंदे, गांज्या, पानटपरीत गुटखा खुलेआम विक्री होत आहे.
या भागात नामांकित शिक्षणसंस्था, सुसज्ज हाॅस्पिटल, विविध कंपन्या असुन याठिकाणी नोकरी धंद्यासाठी आलेला नागरिक यांना या गोष्टींचा नाहक त्रास होत आहे. नशा केल्यानंतर होणारे वाद, भांडणे, आणि खुना सारखे गुन्हा घडत आहेत. अवैध धंदे करणार्यांना कायदा सुव्यवस्थेची भान राहिले नाही उलट कायदाचा फायदा आर्थिक माया कमवण्यासाठी केला जातो.
पुर्व हवेलीत ऐके काळी अवैध धंदे चालवण्याचे धाडस करत नव्हते एवढा वचक खाकीचा होता. ग्रामीणचे पोलीस खाते शहरात गेले हिच परिस्थिती राहिल असे नागरिकांना वाटत असतानाच अवैध धंदे तेजीत चालत आहेत. या सामाजिक स्थितीने अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे. पुणे शहराचे शिस्तप्रिय कायद्याचे रखवालदार अशी प्रतिमा असणाऱ्या पोलीसांना या भागातील कायदा सुव्यवस्थेची मोठी समस्या असताना कडक कारवाई होत नाही. तर बिघडललेली सामाजिक शांतता सुधारण्याचे खुप मोठे आव्हान आहे.
पोलीस आयुक्तांचे अवैध धंद्यांना थारा देणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट आदेश असताना हे धंदे राजरोस चालत आहेत एवढी ताकद कोणामुळे येते याची खरी चौकशी होणे अपेक्षित आहे.
या अवैध धंद्याची माहिती संबंधित अधिकारी यांना नसते. त्यांच्या पर्यंत या गोष्टी पोहचत नसल्याने आदेशानुसार अवैध धंदे नाहीत असा ग्रह होतो. प्रत्यक्षात या अवैध धंद्यांना मोठ्या हस्तकांकडून सहकार्य मिळत असल्याची चर्चा आहे हा नेमका कोण? कोणाचा वरदहस्त? कोणाची कोणापर्यंत पोहच? खरा पाठीराखा कोण? वरिष्ठांनी शोधून त्याच्यावर कडक कारवाई करावी.
पुणे सोलापूर रोडवर कदमवकवस्ती ते लोणी काळभोर या शहर महामार्गावर अवैध दारु विक्री, पान टपऱ्यांमधून नशेली पाने, जुगार अड्डे यांनी आपले बस्तान बसवल्याने तरुण गुन्हेगारी मार्गाकडे वळत आहेत. परिणामी गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगारीचे उदात्तीकरण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिरुर हवेली विधानसभेचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके.
विधानसभेत अवैध धंद्यावर आळा बसलाच पाहिजे. सीपी साहेब व लोणी काळभोर पोलीस निरीक्षक यांना या बाबत सुचना करून कडक कारवाई करण्यासाठी सांगितले जाईल. राजकीय व शासकीय लागेबांधे असतील तरी कोणाचीही याबाबत गय न करता कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी मी स्वतःहा लक्ष घालीन. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी विधानसभेत अवैध धंद्यांना पाठीशी घालणार्यान बाबात कुठलीही तडजोड केली जाणार नाही.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा