तुळशीराम घुसाळकर / हवेली
पुणे (हवेली) : २०२५ वर्षातील पहिली तसेच पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी शुक्रवारी आल्याने भाविकांनी थेऊर येथील श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती.

पहाटे पुजारी आगलावे बंधु यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. त्यानंतर चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली यावेळी विश्वस्त केशव विद्वांस उपस्थित होते. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे वतीने मंदिर प्रांगणात मांडव घालण्यात आला होता. दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने बाल कीर्तनकार ह.भ. प. पाटील (महाराज) आळंदी यांचे कीर्तन झाले, चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघला त्यांनतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला. जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली होती. ग्रामपंचायतीचे वतीने दुचाकी व चारचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा