विद्यार्थिनीशी शाळेच्या गेटवरच अश्लील वर्तन; आरोपीला तात्काळ अटक, पालकांत संताप!
शाळेच्या गेटवर थरकाप; मुलीशी अश्लील वागणूक, आरोपीला तत्काळ अटक!

पुणे (हवेली) : गेल्या सहा महिन्यांपासून अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करुन तिची छेडछाड करून तिचेशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरातील एका शैक्षणिक संकुलाच्या परिसरात घडली असून ती गुरुवारी (२४ जुलै) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सचिन किसन राठोड (वय २०) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत १४ वर्षाची मुलगी लोणी काळभोर परिसरातील एका नामवंत शैक्षणिक संकुलात इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिला शाळेत सोडविण्यासाठी तिचे वडील जातात तर आणण्यासाठी फिर्यादी भाऊ जातो. गुरुवारी तिला नेहमीप्रमाणे तिचे वडीलांनी शाळेत सोडले होते. तर तिला आणण्यासाठी तिचा भाऊ गेला त्यावेळी ती शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या लाईटच्या डी.पी. नजीक रडत थांबली होती. तेंव्हा तिला भावाने रडण्याचे कारण विचारले असता, तिने शाळा सुटल्यानंतर मी शाळेच्या मेन गेटजवळील लाईटच्या डी.पी. जवळ वाट पाहत होते. तेंव्हा सचिन राठोड हा त्याच्या स्प्लेंडर मोटार सायकलवरुन आला. त्याने दोन वेळा माझ्याकडे एकटक पहिले. त्यानंतर तो तिसऱ्यांदा माझ्याकडे आला. त्याने दुचाकी थांबवून म्हणाला, “तु काय करत आहेस?” असे म्हणून लगट करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला असे सांगितले. तिने भावाला दिलेल्या माहितीनुसार राठोड याने फेब्रुवारी ते २४ जुलै दरम्यान तिची वारंवार छेडछाड केली आहे. ती घाबरल्यामुळे याबाबत तिने कोणास काही सांगितले नाही. परंतु राठोड याने थेट जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याने तिने ही घटना भावाला सांगितला.
त्यानंतर पिडीतेच्या भावाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सचिन राठोड याच्यावर लैंगीक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ही कामगिरी पुणे शहराचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे, रत्नदिप बिराजदार, अनिल जाधव, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस अंमलदार किशोर कुलकर्णी, सचिन सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
Editer sunil thorat






