
संपादक सुनिल थोरात
पुणे (हडपसर) : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अन निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कार्यक्रम राज्य भरासह पुण्यात उत्साहात सुरू आहे.
माॅडर्न कला महाविद्यालय शिवाजीनगर या ठिकाणी शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू असून अनेक प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहून अध्यापनाची नवीन कौशल्ये, अध्ययन क्षमता व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी नवीन पर्यावरण शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन, शैक्षणिक संशोधन, पायाभूत साक्षरता, आणि संख्याज्ञान अशा अनेक विषयांवर हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.वरिष्ठ वेतनश्रेणी कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० तसेच २१ व्या शतकासाठीचे अध्यापन कौशल्य अशा विविध घटकांची चर्चा होऊन शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.प्रशिक्षणादरम्यान अनेक नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिक्षकांना होत आहे.
या प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून रोहिणी शेलार,जयवंत बोरसे, जीवन जरे काम पाहत आहेत. विविध शाळांतील शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत.



