
पुणे (हडपसर) : जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठीचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जगन्नाथ राठी पुरस्कार विद्यापीठाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य प्र. प्राचार्य डॉ. संगीता जगताप, उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. नीता कांबळे, प्रा. संगीता देवकर, प्रा. रेवती नेवासकर, दत्ता बेसके उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात अजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे उल्लेखनीय काम केले. त्यात कौशल्य विकास कार्यशाळा, विवाहपूर्व समुपदेशन, महिला सक्षमीकरण, छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम, मूल्य शिक्षण कार्यशाळा, संविधान दिन, कवी समेलन, मानवी हक्क कार्यशाळा, संशोधन पद्धती, एफडीपी – शिक्षण पद्धतीचा प्रभाव, ग्राम सर्वेक्षण, व्याख्यानमाला इत्यादी विस्तार कार्यक्रमांचे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, डॉ. नाना झगडे, डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. गणेश गांधीले, प्रा. संगीता देवकर यांनी यशस्वी आयोजन केले होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुखमंत्री आदरणीय मा. ना. अजितदादा पवार, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड. संदीप कदम, खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.



