जिल्हा

पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात निर्धारित नियमांनुसार काम करतील तेच तेथे टिकतील अन्यथा त्यांची उचलबांगडी अटळ ; पोलीस आयुक्त अमितेश कुमार.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आणि गैरप्रकार बंदच असले पाहिजेत. जर कारवाईला फाटा देत असेल, तर त्याची उचलबांगडी होणारच, ; अमितेश कुमार

पुणे : जे पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात निर्धारित नियमांनुसार काम करतील तेच तेथे टिकतील अन्यथा त्यांची उचलबांगडी अटळ आहे. आमचे नियम सरळ आहेत. कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे आम्हाला नको आहेत. हद्दीतील गुन्हेगारांवर वचक हवा. पारदर्शक पोलिसिंगची लाइन सोडता कामा नये.

गुन्हेगार जर पोलिसांना आव्हान देत असतील, तर त्या प्रभारी अधिकार्‍यांचे हे अपयश आहे. त्यामुळे काम न करणार्‍या पोलीस निरीक्षकांची बदली अटळ असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

मागील वर्षभरात दर दोन ते तीन महिन्यांनी पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होत आहेत. यावर पोलीस आयुक्तांनी परखड भूमिका घेत अवैध धंद्याबाबत माझी नो टॉलरंन्स झोन अशी भूमिका आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे आणि गैरप्रकार बंदच असले पाहिजेत. यामुळे कोणी जर कारवाईला फाटा देत असेल, तर त्याची उचलबांगडी होणारच, असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

पोलीस निरीक्षकांच्या सतत होणार्‍या बदल्यांमुळे पोलीस दलात खदखद आहे. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राची माहिती होण्याअगोदरच बदल्या होत असल्याने गुन्हेगारी नियंत्रणात आणायची कशी, असा प्रश्न अनेक अधिकारी विचारत होते.

यावर अमितेश कुमार म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीत पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. त्या पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या वेळेसही बदल्या कराव्या लागल्या. मात्र, आता काही झालेल्या बदल्या या आमच्या भूमिकेशी घेतलेल्या फारकतीमुळे झाल्या आहेत. सराईत गुन्हेगारांकडून हद्दीत सातत्याने गुन्हे होणे, अवैध धंदे आणि गैरप्रकारांमुळे बदल्या कराव्या लागत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??