क्राईम न्युजजिल्हा

शिरूरमध्ये दोन जणांकडून तरुणीवर बलात्कार, दोन आरोपींच्या पोलीसांनी तात्काळ मुसक्या आवळल्या..

पुणे (शिरूर) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात (दि.२५ ) रोजी एका २६ वर्षीय युवतीवर बलात्कार झाला होता. तो आरोपी शिरुर तालुक्यातीलच होता. त्यानंतर काही दिवसातच शिरुर तालुक्यात दारु पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी एका १९ वर्षीय युवतीवर आळीपाळीने बलात्कार करत तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढुन घेतल्याने पुणे जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्वारगेटच्या घटनेला काही दिवस होत नाहीत तोवरच धक्कादायक, ह्रदयाला हेलावणारी घटना घडली. शिरूर तालुक्यात एक युवती आणि तिचा मामेभाऊ रात्रीच्या वेळेस गप्पा मारत बसलेले असताना दारु पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना चाकुचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली.

तसेच आळीपाळीने त्या युवतीवर बलात्कार करुन तिच्या अंगावरील सोनं काढुन घेतल्याचा धक्कादायक प्रकार रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये घडला असुन रांजणगाव पोलिसांनी तात्काळ त्या दोन नराधम आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

याबाबत अमोल नारायण पोटे (वय २५) रा. संस्कृती डेव्हलपर्स पवार बिल्डींग, कारेगाव ता. शिरुर जि.पुणे मुळ (रा. ढोकराई फाटा, ता. श्रीगोदा जि.अहील्यानगर) आणि किशोर रामभाऊ काळे (वय २९) रा संस्कृती डेव्हलपर्स, लेन नं.१, कारेगाव ता. शिरुर जि.पुणे मुळ (रा. किल्ले धारुर, ता.धारुर जि.बीड) अशी अटक केलेल्या दोन आरोपीची नावे आहेत.

याबाबत रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक १९ वर्षीय युवती आणि तिचा २० वर्षीय मामेभाऊ रात्री च्या सुमारास कारेगाव येथुन घरी जात असताना घराच्या काही अंतरावर मोकळया गप्पा मारत बसलेले असताना रात्री ११:०० च्या सुमारास एका दुचाकीवर दोन इसम आले. त्यांनी पिडीत युवती आणि तिच्या मामे भावाला त्यांच्याकडील चाकुचा धाक दाखवुन जीवे मारण्याची धमकी देवुन जबरदस्तीने एकमेकांना चुंबन व शरीर संबध करण्यास भाग पाडले आणि त्यांच्याकडील मोबाईल मध्ये फोटो व व्हिडीओ शुटींग काढुन घेतले.

त्यानंतर पिडीतेच्या मामे भावाला त्यातील एक जण थोड्या अंतरावर घेवुन गेला आणि दुसऱ्याने पिडीतेवर बलात्कार केला. त्याच्यानंतर दुसऱ्या इसमाला बोलावुन घेवुन पहिला इसम पिडीतेच्या मामे भावाकडे गेला. त्यानंतर दुसऱ्या इसमाने पीडिता आणि तिच्या मामे भावाला मारुन टाकीन नाहीतर आणखी लोकांना बोलावुन घेईन अशी धमकी देत पिडीतेवर बलात्कार केला आणि पिडीतेच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरी करुन निघुन गेले.

त्यानंतर पिडीतेने घरी जावुन घडलेला सर्व प्रकार तिच्या बहीणीला सांगितला. त्यानंतर बहीणीच्या पतीने डायल ११२ वर कॉल करुन सदर प्रकाराची माहिती रांजणगाव पोलीसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत पिडीतेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवले आणि आरोपी अमोल नारायण पोटे आणि किशोर रामभाऊ काळे या दोघांना ताब्यात घेतले.

या घटनेचा पुढील अधिक तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार, महिला पोलीस अधिकारी सविता काळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस कर्मचारी वैभव मोरे, उमेश कुतवळ, अभिमान कोळेकर,दत्तात्रय शिंदे माऊली शिंदे, अजित पवार, संदीप मांड,संतोष अडसूळ, व महिला पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. रांजणगाव पोलिसांनी आरोपीना रविवार (दि २) रोजी शिरुर न्यायालयात हजर केले असता आरोपीना ७ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती आरोपीचे अ‍ॅड वकील किरण रासकर यांनी दिली.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??