यशवंतराव चव्हाण कला, क्रिडा महोत्सवात बीट व तालुकास्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार..

डॉ गजानन टिंगरे
पुणे (इंदापूर) : यशवंतराव चव्हाण कला, क्रिडा महोत्सवात बीट व तालुकास्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनिल भोसले मुख्याध्यापक, लालचंद खोमणे, शरयू कुमठेकर, विजया जाधव, रत्नमाला मेहेर जिल्हा शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत वक्तृत्व स्पर्धेत रत्नमाला मेहेर यांचा द्वितीय व व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत विजया जाधव यांचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण कला, क्रिडा महोत्सवात बीट व तालुकास्तरावर यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
यशस्वी उद्योजक रामेश्वर माने यांनी रू.१०००० कींमतीचे ड्रेस लेझीम खेळणाऱ्या मुलांना भेट दिले. संस्थापक सरपंच राजकुमार भोसले यांनी ई-लर्निंग संच व केशव देसाई यांनी शाळेला प्रिंटर देण्याचे जाहीर केले. परी ड्रेपरीच्या वतीने मुलांना वह्या वाटप करण्यात आले. सुजल गांधी फाऊंडेशनच्या वतीन फिल्टर भेट देण्यात आला. देणगी व शैक्षणिक मदत केलेल्या मान्यवरांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
देशभक्तीपर गीतावर लेझीमचे सुंदर प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले.उपस्थितांचे खोमणे सरांनी आभार मानले.मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.




