महात्मा फुले विद्यानिकेतन संस्थेच्या ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.; कदमवाकवस्ती..

पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती येथील ज्ञानदीप विद्यालयांच्या इमारतीच्या प्रांगणात ७६ व्या प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी विशिष्ट संगीत गाण्याने सुरुवात केली व पत्रकार ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य आणि देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून प्रसंगी उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. व नृत्य गीतांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी नागरिकांना ओला कचरा सुका कचरा वेग वेगळा करावा व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा असेही ज्ञानदीप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गीतांच्या सादरीकरणांमधून संदेश दिला आहे.
यावेळी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतचे सदस्य स्वप्निल कदम, राणीताई बडदे, अविनाश बडदे,गुरुदेव जाधव सर, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक शिंदे,व ज्ञानदीप विद्यालयाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ज्ञानदीप विद्यालयाच्या प्रिन्सिपल यांनी ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे यांच्याकडे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्याबाबत सांगितले. व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत सदस्य अविनाश बडदे यांनी बोलताना सांगितले की, शाळेसाठी ग्रामपंचायत मध्ये बोलून आपल्या शाळेसाठी विनामूल्य पाण्याची सोय केली जाईल. व येणाऱ्या काळात ज्ञानदीप विद्यालयात विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यात सुद्धा मदत करू असे बोलताना गुरुदेव जाधव सर यांनी सांगितले आहे.



