सामाजिक

गुड टच आणि बॅड टच ओळखा!’ लोणी काळभोरच्या दामिनी पथकाची शाळांमध्ये जनजागृती ; महिला पोलीस अंमलदार शिल्पा हरिहर..

पुणे (हवेली) : विनयभंग, छेडछाड, अश्लिल, वर्तणुकीच्या घटना घडत आहेत. मुलींना या घटना घडण्याआधीची प्राथमिक माहिती असणे गरजेचे असल्याने लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दामिनी पथकाच्या माध्यमातून जनजागृती अभियान लोणी काळभोर, कदमवाकवस्ती येथील शाळांमध्ये राबविले.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दामिनी पथकाची मुख्य जबाबदारी शिल्पा हरिहर यांच्या कडे देण्यात आली. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत हद्दीतील शाळेत जागृती करत असताना महिला पोलीस अंमलदार शिल्पा हरिहर बोलत होत्या. चांगल्या किंवा वाईट स्पर्शाची जाणीव नसते. त्यामुळे गैरफायदा घेतला जातो. अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनावर अंकुश ठेवण्यासाठी मुलींना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ ओळखता आला पाहिजे. याबाबत मुलांनी आपल्या आईवडिलांना त्वरित माहिती द्यावी. कदमवाकवस्ती जिल्हा परिषद शाळेत ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ या विषयासंबंधात आयोजन शनिवारी (ता.1) आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महिला पोलीस अंमलदार शिल्पा हरिहर, शाळेचे मुख्याध्यापक राजकुमार भोरे, शिक्षक गणेश मोरे, वर्षा राजे निंबाळकर, स्मिता धायगुडे, अंगणवाडी सेविका शीतल काळभोर, मदतनीस शकुंतला काळभोर, आशा बाबर, मनीषा येवले, राधिका धूमके व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना शिल्पा हरिहर म्हणाल्या की, काही लोकं चॉकलेट किंवा खेळण्याचं आमिष दाखवून मुलांना उचलून घेतात, त्यांना अयोग्यरीत्या स्पर्श करतात. अशावेळी अमिषाला बळी न पडता, तेथून पळ काढा. शिवाय या घटनेला घाबरून न बसता, या गोष्टी पालकांसोबत शेअर करण्यास सांगा. शाळेतून घरी जाताना आपल्याच पालकांसोबत जावे, रस्त्याने येताना जाताना सतर्क राहावे. शाळेमध्ये भांडणे, अश्लील शब्दांचा वापर करू नये. तसेच आपातकालीन परिस्थितीमध्ये पोलीस मदतीची गरज भासल्यास पोलीस हेल्पलाइन नंबर ११२, महिला हेल्पलाइन नंबर १०९१, त्याच प्रमाणे दामिनी मार्शल यांच्याशी तात्काळ संपर्क करावा. असेही शिल्पा हरिहर यांनी सांगितले.

दरम्यान, मुलींच्या सोबत अत्याचाराच्या घटना घडू नयेत म्हणून मुलींनी काय काळजी घ्यावी? या करिता लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे दामिनी पथक जनजागृती करीत आहे. मुलींना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ ओळखता यावा या करिता पथकामार्फत प्रयत्न केला जात आहे. मुलामुलींना पोक्सो कायद्यासंदर्भात माहिती दिली जात आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व शाळांना भेटी देऊन मार्गदर्शन करण्याचे करणार आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??