अण्णासाहेब मगर महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न…

पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी बाबूरावजी घोलप साहेब यांच्या जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानमालेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते झाले. प्रा. मुबीन तांबोळी यांचे जिंकण्याचा पासवर्ड, प्राचार्य डॉ.राजेंद्र कांकरिया यांचे वैज्ञानिक प्रा. डॉ. शिवाजी पचरणे यांचे व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी बहि:शाल शिक्षण मंडळ म्हणजे बिनभिंतीची शाळा असून अभ्यासक्रमाबाहेरील जीवनानुभव विद्यार्थ्यांपर्यंत या माध्यमातून पोहोचवता येतात. ” असे मत व्यक्त केले.
स्वतःची बलस्थाने व कमतरता ओळखून उपलब्ध असणाऱ्या संधींची यादी करा. वेळेचे व्यवस्थापन, कष्ट करण्याची तयारी, स्मार्ट वर्क, शिष्टाचार, संभाषण कौशल्ये, देहबोली यांचा प्रभावी वापर करा असे प्रा. मुबीन तांबोळी यांनी सांगितले. भोवताली घडणाऱ्या गोष्टींची जिज्ञासा बाळगून त्यामागील कार्यकारणभाव समजून घ्या. विज्ञान आपल्याकडे आले पण वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे कठीण जात आहे. व्यक्तीनिष्ठ पेक्षा वस्तुनिष्ठ राहिले पाहिजे असे मिस्टर डॉ. राजेद्र कांकरिया यांनी व्यक्त केले. तर डॉ. शिवाजी पाचरणे यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी आवशक असणारे घटक विशद करून व्यक्तिमत्व विकासाची संकल्पना स्पष्ट केली.
या प्रसंगी या प्रसंगी महाविद्यालयाचे या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे , केंद्र कार्यवाह डॉ. नाना झगडे, डॉ. अश्विनी घोगरे, प्रा.जयश्री अकोलकर, प्रा. अर्चना जाधव, प्रा. वैशाली पवार, प्रा. मनीषा पंडित, प्रा. सूरज काळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र कार्यवाह प्रा. डॉ. नाना झगडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अश्विनी घोगरे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.





