महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी केले कळसूबाई शिखर सर….

पुणे (हवेली) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. ६ व ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटसाठी कळसुबाई गिर्यारोहण आणि सांस्कृतिक आदानप्रदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सव समिती अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संदीप पालवे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य, अधिसभा सदस्य सचिन गोर्डे पाटील, अधिसभा सदस्य चिंतामण उगले, वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके, वनरक्षक दत्तात्रय पडवळ, शीतल तळकडे, डॉ. सौरभ दहिवळे, डॉ. विवेक कावटकर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे खजिनदार अॅड. मोहनराव देशमुख यांनी विद्यापीठाने दिलेली जबाबदारी आमची संस्था आनंदाने स्वीकारते. एनसीसीचे शिस्त व खडतर कवायतीमुळे कणखर बनलेले असतात. त्यांनी इथला निसर्ग, संस्कृती यांचे निरीक्षण करून विद्यापीठाचा हे शिबीर आयोजित करण्याचा हेतू सफल करावा असे आवाहन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सव समिती अध्यक्ष व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी कळसूबाई गिर्यारोहणातून आपली शारीरिक क्षमता पडताळहून पाहण्याची संधी आहे. गिर्यारोहण करताना समूहाने चढा. एकमेकांना सहकार्य करा. कळसूबाई, भंडारदरा या परिसराला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून कृषी संस्कृतीच्या प्रारंभीच्या पाऊलखुणा इथे सापडतात. या निसर्गरम्य परिसराला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले आहे आणि इथल्या मूळ सौंदर्याला बाधा येत आहे. तरी इथल्या शाश्वत विकासासाठी आपण प्रयत्न करत राहू. विद्यार्थ्यांच्या हितासाठीच्या उपक्रमासाठी विद्यापीठाचे कायम सहकार्य असेल. असे सांगितले.

दरम्यान या प्रसंगी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे कॅडेट्सची प्रजासत्ताक दिनी राजपथ दिल्ली येथे संचलनासाठी निवड झाल्याबद्दल कॅडेट एस.यु.ओ. प्रतीक माने, कॅडेट एस.यु.ओ. सूरज थोरात तसेच राज्य प्रजासत्ताक दिनी मुबई येथे संचलनासाठी निवड झाल्याबद्दल ओम थोपटे यांचे सत्कार करण्यात आले.

प्रा. अनिल मरे, डॉ. अर्जुन डोके, डॉ. राणी भगत हे तज्ज्ञ साधन व्यक्ती म्हणून उपस्थित होते. पहिल्या दिवशी सांकृतिक आदान प्रदान कार्यक्रमात विद्यार्थी व स्थानिक कलाकारांनी आदिवासी नृत्याचे बहारदार सादरीकरण करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पहाटे कळसूबाई शिखरावर गिर्यारोहण करण्यात आले.

या गिर्यारोहण शिबिरात विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संदीप पालवे, सागर वैद्य, डॉ. नितीन घोरपडे अधिसभा सदस्य सचिन गोर्डे पाटील वित्त व लेखा अधिकारी डॉ. चारुशीला गायके प्रदीप कोळी, मयूर चोरडिया यांनी विद्यार्थ्यांसोबत गिर्यारोहण करत विद्यार्थांना प्रोत्साहन दिले. या शिबिरात विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पुणे, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेचे १५० कॅडेट्स व ३० प्राध्यापक सहभागी झाले होते.

समारोप प्रसंगी अक्षय अपसूकर, कांचन भगत, कल्याणी सोनवणे, विद्या भोसले, श्रेयस पाटील, आदिती शिंदे व मेजर विक्रांत कावळे , व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संदीप पालवे यांनी मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी सहा. कुलसचिव श्रीपाद बुरकुले, संचालक पुंबा डॉ. उमेश राऊत, श्री प्रदीप कोळी, श्री मयूर चोरडिया प्रा. आशिष सांगळे, प्रा. मनोहर जाधव, प्रा. नरेंद्र फटांगरे, प्रा. बांदल लाड, प्रा. विक्रांत कावळे, प्रा. ज्ञानेश्वर चिमटे, जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले, प्रा. तुषार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, डॉ. सविता कुलकर्णी, कॅप्टन डॉ. धीरज देशमुख, डॉ. गणेश गांधीले, डॉ. नाना झगडे, डॉ. दत्तात्रय संकपाळ, डॉ. गणेश आवटे, डॉ. वंदना सोनवले, प्रा. ऋषिकेश मोरे, प्रा. अविनाश राठोड,प्रा. अर्चना श्रीचप्पा, दत्ता बेचके, राजू औटे, चंद्रकांत साठे, अनाना शिंदे यांनी या शिबिराचे संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. आशिष सांगळे यांनी मानले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??