आशिया कप 2025 : भारतीय संघ जाहीर, शुभमन गिलला उपकर्णधारपदाची जबाबदारी…

मुंबई : आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 9 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ 14 सप्टेंबर रोजी आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे.
अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलकडे या स्पर्धेसाठी उपकर्णधार पद देण्यात आले आहे. तर निवड समितीने यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला या संघात स्थान दिलेला नाही.
आशिया कप 2025 साठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे…
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर ), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), हर्षित सिंह राणा आणि रिंकू सिंग
Editer sunil thorat




