
पुणे (हडपसर) : वेलफेअर मेडिकल फौंडेशन संचालित येथील विलू पूनावाला मेमोरियल रुग्णालयात गुढघा व खुबा प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन दि. १२ रोजी करण्यात आले आहे. हडपसर विधानसभा आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. भूषण माणगावकर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नकुल शाह, प्रमोद खिवंसरा, सिरम इन्स्टिटयूट कामगार संघटनेचे पदाधिकारी सचिन तुपे, अजित भिंताडे, अतुल कदम, सचिन गायकवाड, प्रवीण घुले, गिरीश मोरे, अजित खैरे आदी यावेळी उपस्थित होते.
अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. शाह पुढे म्हणाले, “देशातील पस्तीस टक्के लोकसंख्या गुडघ्याच्या संधीवाताने ग्रस्त आहे. त्यामुळे या आजारावर सामान्य माणसाला मोठा खर्च सोसावा लागत आहे. पूनावाला रुग्णालयाने भारतीय शैलीला अनुरूप नैसर्गिक गुडघा लवचिकता येण्यासाठी सवलतीच्या दरात तपासणी व शस्रक्रिया शिबीर सुरू केले आहे. पुढील पंधरा दिवस ते सुरू राहणार आहे.’




