सामाजिक
श्री विश्वकर्मा जयंती निमित्त चिंबळीत विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात साजरी…

पुणे : श्री विश्वकर्मा जयंती निमित्त चिंबळी (बर्गेवस्ती) येथे अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, असे कोषाध्यक्ष गुलाब खंडागळे यांनी सांगितले.
श्री विश्वकर्मा जयंती निमित्त सकाळी अभिषेक व महापुजा करण्यात आली व त्यानंतर आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दुपारी रूपीनगर येथील विठ्ठल रूक्मिणी सांप्रदायिक महिलांचे संगीत भजनांचा कार्यक्रम आयोजित करून महाप्रसाद ठेवण्यात आला.
यावेळी अध्यक्ष चंद्रकांत कदम, उपाध्यक्ष कालीदास खंडागळे, सरचिटणीस संजय गायकवाड, संघटक शिवाजी भालेकर, अमर गायकवाड, राजेंद्र खंडागळे, उपसरपंच राहुल चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत खंडागळे आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटक दत्तात्रय गुंजाळ यांनी केले.



