इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी राजश्री पवार यांची निवड…

गणेश वाघ / इंदापूर
पुणे (इंदापूर) : इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज भिगवण गटातील महिलांची तालुका स्तरावरील विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली.
इंदापूरचे लोकप्रतिनिधी व राज्याचे युवा कल्याण व अल्पसंख्याक आणि औषध मंत्री नामदार दत्तात्रय मामा भरणे. यांच्या हस्ते महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.
यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा साधना नवनाथ केकाण, महिला आघाडी प्रमुख रेहाना मुलाणी व इतर अनेक महिला तालुका पदाधिकारी उपस्थित होते. इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रेडा ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या राजश्री मच्छिंद्र पवार यांना इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी नियुक्तीपत्र यावेळी देण्यात आले. या नियुक्तीबद्दल रेडा गावातील सर्व महिलांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
यावेळी राजश्री पवार यांनी या नियुक्तीबद्दल पक्षाने दिलेल्या संधीचा पुरेपूर वापर करून महिला सबलीकरण व इंदापूर तालुका महिला कॉंग्रेस संघटना वाढीस पुर्ण वेळ देऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.



