अण्णासाहेब मगर महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला संपन्न..

पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे भूतपूर्व अध्यक्ष सहकार महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या जयंतीचे औचित्य साधून यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानमालेत डॉ. पितांबर पाटील यांचे सॉफ्ट स्कील डेव्हलमेंट’, अभिनेत्री प्रतिभा वाले यांचे ‘ कथाकथन’ आणि प्रा. राजकुमार कदम यांचे ‘आमची माती आमची माणसं’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविक बहि:शाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह प्रा. डॉ. नाना झगडे यांनी केले.
बहि:शाल शिक्षण मंडळाच्या व्याख्यानमालेतून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा बाहेरील अनुभव, ज्ञान मिळते. त्यामुळे विद्यार्थी बहुश्रुत होतात. मामासाहेब मोहोळ यांनी शिक्षण, क्रीडा आणि सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, प्रा. अनिल जगताप, डॉ. दत्तात्रय संकपाळ, प्रा. शकील तांबोळी, प्रा. नलिनी म्हेत्रे, प्रा. राजेश देशमुख, प्रा. स्नेहल वाघमारे, प्रा. लता जराड, प्रा. धर्मेंद्र जगताप, प्रा. दिलीप देशमुख, प्रा. विनोद कुंडलकर, डॉ. वंदना सोनवले, प्रा. अश्विनी घोगरे, प्रा. ऋषिकेश मोरे, प्रा. सूरज काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वंदना सोनवले यांनी केले तर आभार डॉ. अश्विनी घोगरे यांनी मानले.





