
लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एमआयटी-आयडी) तर्फे ‘क्वासार २०२५ – Designing What’s Next’ ही दोन दिवसीय राष्ट्रीय डिझाइन परिषद ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
डिझाइनच्या भविष्यदृष्टीचा शोध…
ही परिषद सर्जनशीलता आणि नवोपक्रमाचा उत्सव म्हणून साजरी केली जाणार असून, डिझाइनचा प्रभाव उद्योग, तंत्रज्ञान आणि समाज या सर्व क्षेत्रांवर अधोरेखित करण्याचा उद्देश आहे. या परिषदेत देशभरातील नामवंत डिझाइन तज्ज्ञ, उद्योगक्षेत्रातील व्यावसायिक, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
व्याख्याने, चर्चासत्रे आणि कार्यशाळांचा मेळावा…
परिषदेत विविध व्याख्याने, चर्चासत्रे, संशोधन पोस्टर सादरीकरणे, डिझाइन प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. कार्यशाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित दृश्य संवाद, सर्जनशील अनुभव, पॅकेजिंग डिझाइन, स्टॉप-मोशन अॅनिमेशन, ट्रान्सपोर्टेशन डिझाइन, UI/UX आणि मटेरियल इनोव्हेशन यांसारख्या विषयांचा समावेश आहे.
ही माहिती एमआयटी इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनचे अधिष्ठाता डॉ. नचिकेत ठाकूर यांनी दिली.
तरुणाईसाठी सर्जनशील व्यासपीठ…
कार्यक्रम अधिक रंगतदार करण्यासाठी आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या आहेत. खालील प्रमाणे
‘आलाप’ गायन स्पर्धा
‘स्वरफ्युजन’ वाद्य संगीत स्पर्धा
‘अभिव्यक्ती’ एकपात्री अभिनय
‘माइक ड्रॉप’ स्टँड-अप कॉमेडी
‘नृत्यवर्स’ समूह नृत्य
या स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांना कल्पकता आणि कलागुण दाखविण्याची संधी मिळणार आहे.
डिझाइन रिसर्च पोस्टर स्पर्धेला उत्साहवर्धक प्रतिसाद…
सहाय्यक प्राध्यापक डॉ. हर्षित देसाई यांनी सांगितले की, या परिषदेच्या निमित्ताने आयोजित ‘डिझाइन रिसर्च पोस्टर स्पर्धेस’ देशभरातील ४० हून अधिक डिझाइन महाविद्यालयांमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला आहे. ५०० पेक्षा जास्त प्रतिनिधींच्या सहभागामुळे ही परिषद देशातील डिझाइन क्षेत्रातील सर्वाधिक प्रभावी उपक्रम ठरणार आहे.
“क्वासार म्हणजे सर्जनशीलता, शिक्षण आणि नेतृत्व यांचा संगम”…
डॉ. नचिकेत ठाकूर म्हणाले, “संस्थेचे कार्याध्यक्ष आणि प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘क्वासार’ ही परिषद सर्जनशीलता, शिक्षण आणि नेतृत्व यांचा संगम आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वास्तव जगातील डिझाइन आव्हाने आणि संधींचा अनुभव घेता येतो. तसेच उद्योगातील डिझाइन विचारवंतांशी संवाद साधण्याची आणि नव्या सहकार्याच्या शक्यता शोधण्याची संधी मिळते.”
Editer sunil thorat



