राजकीय

सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत, ९० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळवण्याची संधी..

पुणे : ‘घरगुती ग्राहकांचे वीज देयक शून्यवत करणाऱ्या पीएम सूर्यघर योजनेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे,’ असे आवाहन केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी केले. या योजनेचा जागर करण्यासाठी महावितरण आणि ‘महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ (मास्मा) यांच्या वतीने बनविण्यात आलेल्या सौररथाचे उद््घाटन मोहोळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मोहोळ यांनी हे आवाहन केले. आमदार सिद्धार्थ शिरोळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, ‘मास्मा’चे अध्यक्ष शशिकांत वाकडे, खजिनदार समीर गांधी उपस्थित होते.

       घराच्या छतावर एक ते तीन किलोवॅट क्षमतेच्या अनुदानित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी या योजनेत आहे. घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॉटसाठी ३० हजार, दोन किलोवॉटसाठी ६० हजार आणि तीन किलोवॉट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामाईक उपयोगासाठी ५०० किलोवॉटपर्यंत प्रति किलोवॉट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे.

        या योजनेचा जागर करण्यासाठी पाच दिवसीय सौर रथाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मोहोळ यांच्या हस्ते योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान मंजुरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यकारी अभियंता विजय फुंदे यांनी सूत्रसंचालन केले.

             वीज ग्राहकांशी संवाद साधणार

        पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी येत्या गुरुवार(ता. २३) पर्यंत हा सौर रथ फिरणार आहे. या रथाद्वारे ‘डिजिटल स्क्रिन’च्या माध्यमातून वीज ग्राहकांशी थेट संवाद साधला जात आहे. योजनेची माहिती, फायदे, प्रतिकिलोवॉट मिळणारे अनुदान, ऑनलाइन अर्ज करण्याचे प्रात्यक्षिक तसेच माहिती पत्रकाच्या माध्यमातून माहिती देणार आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??