रोहित्र चोरांचा धुमाकूळ ; सहा महिन्यांत ३९ चोरी! चोरांचा सुळसुळाट, ; पुर्व हवेली.

पुणे (हवेली) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, थेऊर, कोरेगाव मूळ, आष्टापूर, टिळेकरवाडीसह पूर्व हवेलीतील परिसरातील नदी व कालव्याच्या पट्ट्यातील भागात विद्युत रोहित्र चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे पाणी असून, पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मागील जवळपास सहा महिन्यांत ३९ रोहित्रांची चोरी झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गेल्या सात आठ महिन्यापासून नदी पट्ट्यातील कोरेगाव मूळ, भिवरी, थेऊरसह परिसरातील गावांमधून रोहित्रांची चोरी होत असल्याच्या घटना सातत्याने घटत आहेत. अनेक गावांतील निर्मनुष्य भागातील तसेच नदीकाठचा भाग, गावापासून दूर असलेल्या वस्ती, शेतातील परिसरातील विद्युत रोहित्र चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे.
पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याचे शेतकरी…
तांब्याचे वाढलेले भाव यामुळे चोरीचे प्रमाण वाढले असून याबाबत लोणी काळभोर, उरुळी कांचन पोलिस ठाण्यात तक्रारी यापूर्वी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र पोलिस प्रशासन याबाबत शोध घेत नसून, या गंभीर घटनेची दखन न घेता याकडे दुर्लक्ष करीत आहे, अशी शंका परिसरातील शेतकरी व नागरिकांना येत आहे. चोरीचे तांबे विक्रेते आणि मोड घेणारे पोलिस खात्यास माहीत नाही का, अशी चर्चा नागरिक आपसांत करीत आहेत. सगळ्याच तक्रारी पोलिस ठाण्यात होत नाहीत. तसेच यामुळे शेतकऱ्यांच्या पिकास पाणी न मिळाल्याने शेतीमालाचे नुकसान होते.
तांबे जवळपास ७०० रुपये किलो…
चोर बाजारातील तांबे धातूचा भाव सुमारे ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलो असल्याने रोहित्र चोरीचे प्रमाण वाढले आहे. एका विद्युत रोहित्रामध्ये सुमारे १०० ते १२० किलो तांबे असते. त्यामुळे एका विद्युत रोहित्र विक्रीतून सुमारे ७० ते ८० हजार रुपये मिळतात. काही वेळा ऑईलची देखील विक्री केली जाते.
अंधाराचा फायदा, चोरट्यांनी चोरी करण्याचे प्रमाण वाढवले.
गेल्या सहा महिन्यात सुमारे ३९ विद्युत रोहित्र चोरीस गेले आहेत. नदीकाठ आणि दुर्गम भागात विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण अधिक आहे. नागरी भागाशिवाय चोरी होणाऱ्या विद्युत रोहित्राच्या जागी नवीन जनित्र बसविण्यास जवळपास दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे अंधारामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढू शकते. शेतातील पोलवर वीज वितरणाची लाईटचीही व्यवस्था अपुरी असल्याने चोरांचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत वीज वितरणाने लक्ष दिले पाहिजे असे शेतकरी चर्चा करतात.
पोपट साठे (शेतकरी)
ग्राहक कल्याण फाउंडेशन पुणे जिल्हा उपाध्यक्ष
रोहित्र चोरट्यांना जोपर्यंत पोलीस प्रशासन कडक कारवाई करत नाही, तोपर्यंत या रोहित्र चोरीच्या घटना ह्या होतच राहणार आहेत. पकडलेल्या अशा टोळ्यांवर पोलीस प्रशासनाने मकोका कारवाई करावी. या चोरांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. वारंवार रोहित्र चोरीच्या घटनांही होत आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांनी गस्त वाढवून चोरांना पकडावे व शेतकऱ्यांचे अतोनात होणारे नुकसान टाळावे.
म. भ. धाडवे
उपकार्यकारी अभियंता, उरुळी कांचन
वीज वितरणमार्फत पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून पत्र व्यवहार, ही करण्यात आला आहे. शेतातील रोहित्र चोरीला जावू शकतात याची यादी पोलीस प्रशासनाने मागितली असता यादी देण्यात आली आहे. मागील हप्त्यात पोलीस प्रशासन, वीज वितरण याची बैठकीत रोहित्राच्या ठिकाणी सी सी टिव्ही व अलार्म याची व्यवस्था शेतकरी यांना करायची आहे असे पोलीस प्रशासना कडून सांगण्यात आले आहे. असे यावेळी सांगितले.



