प्रेमसंबंधातून हत्येचा उलगडा ; पतीने घेतला सूड, पाच जण जेरबंद…
पतीकडून अमानवी सूड! पत्नीच्या प्रियकराचा खून, गुन्ह्यात पाच आरोपी अटकेत...

पुणे (दौंड) : दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याचे हददीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला झालेल्या अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा लागला असून सदर खुन पत्नी बरोबर अनैतिक संबंध असल्याने पतीसह पाच जणांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीसह पाच जणांना जेरबंद केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार लखन किसनराव सलगर (वय २४, रा. टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव) याचा खुन केल्याप्रकरणी योगेश दादा पडळकर, (वय २५), राजश्री योगेश पडळकर (वय २३, दोघे रा. माळशिरस ता. पुरंदर जि. पुणे) या पत्नी समवेत राजश्री हिचा भाऊ विकास आश्रुबा कोरडे (वय २१, रा. आनंदवाडी टाकळी ढोकी ता. जि. धाराशिव) तसेच विकास यांचे मित्र शुभम उमेश वाघमोडे (वय २२, रा. मुरुड ता. जि. लातूर) व काकासाहेब कालिदास मोटे (वय ४२, रा. येवती ता. जि. धाराशिव) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबतची सविस्तर हकीकत अशी की २७ जुन रोजी सकाळी ९ वाजण्याच्या पूर्वी (नक्की वेळ माहित नाही) यवत गावचे हद्दीत भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन एक अनोळखी इसम, वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे (नाव व पत्ता माहित नाही.) यास तीव्र धारदार अज्ञात हत्याराने हल्ला करून संपुर्ण डोक्यावरती, उजवे छातीवर, पाठीवर, वार करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने कोणत्यातरी अज्ञात ज्वालाग्रही पदार्थ मयताचे शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवुन जीवे ठार मारले आहे. म्हणुन पोलीस हवालदार विनायक हाके यांनी सरकारतर्फ अज्ञात आरोपीविरुध्द यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे आधारे विश्लेषण करून तसेच इतर जिल्ह्यातील दाखल मानव मिसिंगची तपासणी सुरू असताना ढोकी पोलीस स्टेशन, जिल्हा धाराशिव येथे लखन सलगर हे हरवले असल्याचे दाखल होते. अधिक तपासांत भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याशी मिळालेला मृतदेह हा लखन सलगर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता लखन व राजश्री यांचे अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना समजले. या कारणांमुळे वरिल पाच जणांनी लखन यांस भुलेश्वर पायथ्याला नेऊन तीव्र धारदार अज्ञात तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून संपुर्ण डोक्यावरती, उजवे छातीवर, पाठीवर, वार करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकुन त्यास पेटवून देवुन जीवे ठार मारले. यासंदर्भातील कबुली त्यांनी दिली आहे. या पाचही आरोपीना स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण व यवत पोलीसांनी ११ जुलै रोजी ताब्यात घेतले असून सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास हा वरिष्ठांचे आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने हे करित आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधिक्षक, बारामती विभाग गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी, दौड बापुराव दडस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल गावडे (स्था.गु. शा), महेश माने, प्रविण संपांगे, पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार सचिन घाडगे, पोलीस हवालदार मोमीन शेख, अजित भुजबळ, अजय घुले, धिरज जाधव, यांचे समवेत यवत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार संदीप देवकर, गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, विकास कापरे, दत्ता काळे, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, नारायण वलेकर, गणेश कर्चे, सुनिल नगरे, विनायक हाके, संतोष कदम, प्रमोद गायकवाड, परशुराम म्हस्के, प्रमोद शिंदे, वैभव भापकर, मारूती बाराते, विनोद काळे, दिपक वेताळ, प्रणव ननवरे, प्रतिक गरूड, शुभम मुळे, सचिन काळे, मोहन भानवसे, स्वप्नाली टिळवे यांचे पथकाने केली आहे.
मुख्य संपादक श्री सुनिल थोरात



