साधना संकुलातील सर्व केंद्रावर एस.एस.सी परीक्षा सुरळीत सुरू ; हडपसर

पुणे (हडपसर) : रयत शिक्षण संस्थेच्या साधना शैक्षणिक संकुलात एस.एस.सी. परीक्षेसाठी एकूण तीन केंद्र आहेत. यामध्ये साधना विद्यालय हडपसर मुले, चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालय व साधना इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर. या तीनही केंद्रावर एस.एस.सी परीक्षा सुरळीतपणे सुरू झाली. शासनाच्या काॅपी मुक्त अभियानाचे तंतोतंत पालन करण्यात आले.
साधना विद्यालय हडपसर मुले या केंद्रावर एकूण ८८२ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ असून एकूण ३६ ब्लाॅक आहेत. या केंद्रावर साधना विद्यालय हडपसर मुले, साने गुरूजी विद्यालय हडपसर,व महात्मा फुले विद्यालय गोंधळेनगर या शाळेतील विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. या केंद्राचे केंद्रसंचालक दत्तात्रय जाधव काम पाहत आहेत.
चंद्रभागा बाबुराव तुपे साधना कन्या विद्यालयात एकूण १०८८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ असून एकूण ४४ ब्लाॅक आहेत. तर या केंद्रावर साधना कन्या विद्यालय,महात्मा फुले बंटर शाळा,कै. रामचंद्र बनकर शाळा गोंधळेनगर, एंजल्स स्कूल, के. डी.कोतवाल स्कूल, गर्ल्स इंग्लिश मेडिअम साधना, हडपसर विद्यालय रामटेकडी या शाळेतील विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. या केंद्रावर छाया पवार केंद्रसंचालक म्हणून काम पाहत आहेत.
साधना इंग्लिश मेडिअम स्कूल या केंद्रावर एकूण ९४७ विद्यार्थी प्रविष्ठ असून एकूण ३८ ब्लाॅक आहेत. या केंद्रावर साधना इंग्लिश मीडियम स्कूल, एंजल्स स्कूल, विठ्ठल तुपे इंग्लिश मीडियम स्कूल, वर्धमान इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेतील विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. तर रोहिणी सुशीर या केंद्रसंचालक म्हणून काम पाहत आहेत.
साधना संकुलातील या तीनही केंद्रावर एस.एस.सी बोर्ड परीक्षा काॅपीमुक्त वातावरणात सुरू झाली अशी माहिती प्राचार्य दत्तात्रय जाधव, विठ्ठल तुळजापुरे व रोहिणी सुशीर यांनी दिली.



