लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या दामिनी प्रमुख प्रमुख शिल्पा हरिहर यांची “समर्पण वृद्धाश्रम” येथे मार्गदर्शन, कार्यशाळा आयोजित ; कवडीपाट…

पुणे (हवेली) : (दि.०२) रोजी wpc शिल्पा हरिहर लोणी काळभोर दामिनी मार्शल यांनी “समर्पण वृद्धाश्रम” कदम वाकवस्ती, सिद्धिविनायक पार्क, स्टार सिटी या ठिकाणी भेट दिली.
वृद्धाश्रमाचे संचालक लक्ष्मण मासाळ यांची भेट घेतली असता “समर्पण वृद्धाश्रम” या ठिकाणी महिला वृद्ध यांची संख्या ३४ व पुरुष वृद्ध यांची संख्या १८ आहे, त्यांच्या सेवेसाठी ५ महिला कामगार व २ पुरुष कामगार आहेत, २ महिला आचारी असून वृद्धांना दोन वेळेचा नाष्टा व दोन वेळेचे जेवण हे “समर्पण वृद्धाश्रम” मार्फत दिले जाते. अशी माहिती “समर्पण वृद्धाश्रम” संचालक लक्ष्मण मासाळ यांनी दिली,
त्यातील काही वृद्ध आजारी असल्याकारणाने १०ते १५ वृद्धांची कार्यशाळा घेतली, कार्यशाळेदरम्यान त्यांना सर्व त्रास देणारा भूतकाळ विसरून आनंदी जीवन जगण्याबद्दल योग्य ते सर्व मार्गदर्शन केले, एकटे एकटे बसण्यापेक्षा सर्वांनी एकमेकांशी गप्पा मारा, वाईट दिवस विसरून जावा, आनंदाचे दिवस आठवण एकमेकांना ते प्रसंग सांगा, बोला, हसा खेळा अशा “समर्पण वृद्धाश्रम” मध्ये वृद्धावस्थेत मन रमवणाऱ्या बऱ्याचशा गोष्टींबद्दल मार्गदर्शन केले.
अपातकालीन परिस्थितीमध्ये वृद्धांना जर पोलीस मदतीची गरज भासली तर पोलीस हेल्पलाइन नंबर ११२, महिला हेल्पलाइन नंबर १०९१, त्याचप्रमाणे दामिनी मार्शल यांचे संपर्क नंबर देऊन तात्काळ संपर्क करा असे वृद्धाश्रमाचे संचालक लक्ष्मण मासाळ यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी शिल्पा हरिहर लोणी काळभोर दामिनी मार्शल यांनी “समर्पण वृद्धाश्रम” ची राहण्याची व्यवस्था, बाथरूम, जेवणाची व्यवस्था तसेच त्या वृद्धांचे औषधे यांची याबाबत माहिती घेऊन नवीन सुचना दिल्या.
लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकाने भेट देऊन एक नवचैतन्य निर्माण केले. तसेच वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविला त्याबद्दल “समर्पण वृद्धाश्रम” चे संचालक लक्ष्मण मासाळ यांनी आभार व्यक्त केले.





