क्राईम न्युजजिल्हामहाराष्ट्र

जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा करणारी परराज्यातील चौघां जणांची टोळी जेरबंद, १२ तासात गुन्हा उघडकीस ; यवत.

१२ तासांचे आत गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांचे मोठे यश..

पुणे (दौंड) : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील जबरी चोरीसह खुनाचा गुन्हा करणारी परराज्यातील चौघां जणांची टोळी जेरबंद करून १२ तासांचे आत गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांना मिळाले यश..

“दिनांक ०५/०३/२०२५ रोजी रात्री १०:३० चे मुमारास यवत पो स्टे हद्दीतील सहकारनगर परिसरात राहणारे निळकंठेश्वर मंदिराजवळील विश्वजीत शशीकांत चव्हाण यांचे राहत्या घरात तीन इसमांनी अनधिकृतपणे घरात प्रवेश करून घरात झोपलेल्या दोन पुरूष व दोन महिलांना मारहाण करणेत आली व सोन्याचे दागिने चोरी करणेत आलेले आहेत. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत विश्वजीत शशिकांत चव्हाण वय ३३ वर्षे हे मयत झालेले असून इतर सदस्य हे गंभीर जखमी झाले असून सदर प्रकाराबाबत यवत पो स्टे गुग्नं २३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३,१०९,३३३,३ (५) प्रमाणे दि. ०६/०३/२०२५ रोजी सारीका विश्वजीत चव्हाण यांचे फिर्यादीवरून गुन्हा नोंदविणेत आलेला आहे.

सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने समांतर तपास सुरू करणेत आला, सदर गुन्हयाचे ठिकाणी मा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी भेट देवून गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून यवत पो स्ट ची दोन पथके, स्थानिक गुन्हे शाखेची पाच पथके तयार करून सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन व सुचना देण्यात आल्या.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने नेमलेल्या तपास पथकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, घटनास्थळाचा परिसर हा दुर्गम असल्याने सीसीटीव्हीचा अभाव होता, घटना झालेनंतर यातील फिर्यादी यांनी परिसरातील लोकांना मदतीस बोलाविले होते, त्यापैकी दोन व्यक्तींनी चोरट्यांचा पाठलाग करत असताना चोरटे कॅनॉलचे दिशेने रेल्वे रुळाकडे पळून गेल्याचे सांगितले. सदर व्यक्तींकडे केलेल्या चौकशीत तसेच त्या परिसरात शोध घेतला असता आरोपी पळून गेलेल्या भागात एक संशयित बंग मिळून आली त्यामध्ये कपडे व इतर साहित्य मिळाले असून एका जींगवर युनिव्हर्सिटी दिल्ली असे लिहीलेले होते. त्या आधारे आरोपी हे उत्तर भारतातील असल्याचे पोलीसांना निष्पन्न झाले.

सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान चार संशयित इसम हे पुणे स्टेशन कडे गेल्याचे बातमी गोपनीय बातमीदारांकडून मिळाली होती. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्ली बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे तसेच ट्रॅव्हल्स स्टॉपवर आरोपींचा शोध घेत असताना येरवडा परिसरातील गुंजन थेटर चौकातील ट्रॅव्हल्स स्टॉपवर दोन संशयित इसम मिळून आले, त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी समाधानकारक उत्त्तरे न देता हालचाल कर लागल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून सखोल चौकशी करता त्यांनी त्यांचे नाव १) सलमान दिलशाद शेख वय २८ वर्षे रा. पठाणकोट मोहल्ला, हुश मस्जिद जवळ, बडौत ता. जि. बागपथ राज्य उत्तर प्रदेश २) मोमीन अकबर शेख वय-४५ रा. पठाणकोट मोहल्ला, हुश मस्जिद, जवळ बडौत ता. जि. बागपथ राज्य- उत्तर प्रदेश अशी असल्याची सांगितलेली असून त्यांनी त्यांचे साथीदार नाव ३) रावतसिंग चौधरी जगदेवसिंग तोमर वय २६ धंदा रा. बडौत जि. बागपथ राज्य उत्तर प्रदेश ४) गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान वय-२५ धंदा-गुराळ कामगार रा. काशीराम कॉलनी बडौद ता. जि बागपथ राज्य उत्तर प्रदेश यांच मदतीने गुन्हा केल्याचे सांगितले.

तसेच यातील इतर दोन आरोपी गवतसिंग चौधरी व गुलशन उर्फ मोठा जहांगीर खान हे घटनास्थळाच्या परिसरात त्यांची पडलेली बॅग शोधायला गेले असल्याचे सांगितल्याने त्यांना शोधण्यासाठी यवत पोस्ट चे पथक व स्थानिक गुन्हे शाखेची पथक रवाना करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सदत्ची कामगिरी ही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बापुराव दडस उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस पोलीस स्टेशनचे पालीस निरीक्षक नारायण देशमुख स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि गहुल गावडे, सपोनि दत्ताजीराव गावडे, सपोनि कुलदीप संकपाळ, यवत पोलीस स्टेशनचे मोनि प्रवीण सपांग, मसपीनि सुवर्णा गोसावी, ग्थानिक गुन्हे शाखेचे पोसई अभिजीत सावंत, पोसई अमित सिद-पाटील, यवत पोलीस स्टेशन कडील पोसई किशार वागज, पोसई सलीम शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. फौजदार ईश्वर जाधव, हनुमंत पासलकर, बाळासाहेब कारंड, सचिन घाटग, असिफ शेख, महेश बनकर, अतुल फरेंदे, पोलीस हवालदार रामदास बाबर, विजय कांचन, अभिजीत एकशिंग, राहुल पवार, गहुन धुब, मंगेश थिगळे, योगेश नागरगोजे, रणजित कोंडके, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, सागर नामदास, तुषार भोईट, पोलीस अमलदार मंगेश भगत, निलेश शिंद, अजय घुले अतुल डेरे बिभीषण सस्तुरे तसेच यवत पीलीस स्टेशन कडील अमंलदार गुरुनाथ गायकवाड, संदीप देवकर, महेंद्र चांदणे, गमदास जगताप, अक्षय बांदव, दत्ता त्रय काळे, विकास कापरे, गणेश कुतवळ, विशाल जावळे, प्रमोद गायकवाड, मारुती बाराते, प्रणव ननवरे यांचे पथकांनी केली आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??