क्राईम न्युजजिल्हा

भेसळयुक्त पनीर उत्पादन कारखान्यावर, युनिट सहा व अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई ; मांजरी..

पुणे (हवेली) : पुणे शहरालगत पूर्व हवेलीतील मांजरी येथे भेसळयुक्त पनीर बनविण्यात येत होते. याची खात्रीशीर माहिती पोलिसांना लागताच युनिट ६ आणि अन्न व औषधं प्रशासनाने कारवाई करत तब्बल साडे अकरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला.

(दि.७) या तारखेला गुन्हे शाखेच्या युनिट ६ कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी पोलीस अंमलदार सचिन पवार व रमेश मेमाणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून अन्न व औषध प्रशासन यांना पत्रव्यवहार करून माणीकनगर, मांजरीखुर्द येथे एका शेतातील गोडावुन मध्ये भेसळयुक्त पनीर बनवण्याचे काम चालु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या ठिकाणी यूनिट ६ कडील पथक व अन्न व औषध प्रशासन यांनी धाड टाकली असता तेथे ठिकाणी एकुण १४०० किलो भेसळयुक्त पनीर, ४०० किलो जी एम एस पावडर, १८०० किलो एस एम पी पावडर, ७१८ लिटर पामतेल असा एकुण ११,५६,६९०/- रू.चा मुद्देमाल सापडला आहे.

पंचांसमक्ष भेसळयुक्त पनीरचे नमुणे तपासणीसाठी घेवुन उर्वरीत भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आले आहे व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाई अन्न व औषध प्रशासन हे करीत आहेत. अन्न व औषध प्रशासन, पुणे यांचेकडुन नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे अन्नपदार्थ खरेदी करताना सावधानता बाळगावी तसेच असा प्रकार आढळुन आल्यास त्याबाबत अन्न व औषध प्रशासन यांचेकडे तक्रार करावी.

ही कामगीरी अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालया कडील सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहूल खाडे यांचे मार्गदर्शनाखाली श्री. नारायण सरकटे, सहाय्यक आयुक्त (अन्न) पुणे, बालाजी शिंदे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), पुणे श्रीमती अस्मिता गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी, पुणे, सुप्रिया जगताप, अन्न सुरक्षा अधिकारी, एल डब्ल्यु साळवे, नमुना सहायक, पुणे यांनी केली आहे.

अन्न व औषधं प्रशासनाने नियमित कारवाई करावी..

भेसळयुक्त खाद्य पदार्थ कुठे तयार होतात यावर अन्न व औषधं प्रशासनाने नियमितपणे लक्ष ठेवून सतत कारवाई करणे गरजेची असताना अशा प्रकारची कारवाई नियमित होताना दिसत नाही. पूर्व हवेलीत अन्न भेसळ प्रशासनाने भरारी पथक तयार करून छापेमारी करावी. असे मांजरीतील छापेमारी नंतर नागरिक खाजगीत चर्चा करत आहेत. मांजरीतील कारवाई मुळे पुणे पोलिसांचे विशेष कौतुक होत आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??