जिल्हा

दुर्दैवी घटना ! महाबळेश्वहून परतत असताना पुण्यातील दोन तरुणांचा अपघाती मृत्यू, चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी थेट…

पुणे : होळीच्या सणादिवशी पुण्यातील लोणी काळभोर येथील तरुणांच्या गाडीचा भीषण अपघाताची घटना महाबळेश्वर वाई रस्त्यावरील पसरणी घाटात घडली आहे.

या भीषण अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे इतर दोन सहकारी गंभीररित्या जखमी झाले आहेत.

जखमींना वाईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातामध्ये मृत्यूमूखी पडलेल्या दोन तरुणांच्या घरांच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हा अपघात काल गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास झाला. महाबळेश्वर वाई रस्त्यावरील पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये अक्षय म्हस्कू काळभोर (वय २६ ), सौरभ जालिंदर काळभोर (वय २६) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर वैभव काळभोर, (वय २४ ) बजरंग पर्वतराव काळभोर (वय ३५, सर्व रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी या अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या अपघाताच्या घटनेने लोणी काळभोरमधील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

                            अपघाताची घटना कशी घडली?

काल गुरुवारी १३ मार्च रोजी सायंकाळी एका चारचाकी वाहनाने चौघेजण लोणीकाळभोरच्या दिशेने निघाले होते. वाई-महाबळेश्वर रस्त्यावरील पसरणी घाटात गाडी आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी १०० फुट दरीत कोसळळी. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी चार मित्र महाबळेश्वर येथे फिरायला गेले होते. लोणीकाळभोरकडे परतत असताना ही भीषण अपघाताची घटना घडली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघांना येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, यापैकी अक्षय आणि सौरभ काळभोर यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इतर दोघांवर उपचार सुरू आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??