नवनिर्वाचित सरपंच भरत काळभोर यांची बिनविरोध निवड.. लोणी काळभोर ग्रामपंचायत.
नवनिर्वाचित सरपंच भरत काळभोर, अभ्यासू, होतकरू असल्याने लोणी काळभोर ग्रामपंचायत विकासाची कास धरणार ; लोणी काळभोर..

पुणे (हवेली) : (दि.२४) लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भरत दत्तात्रय काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी झालेल्या सत्कार समारंभा वेळी नवनिर्वाचित सरपंच भरत काळभोर यांनी सांगितले की लोणी काळभोर ग्रामपंचायत ही पुणे जिल्ह्यात एक नंबरची ग्रामपंचायत होण्यासाठी प्रयत्न करणार असुन विकासकामे करताना ज्येष्ठांचे मार्गदर्शन व ग्रामपंचायत मधील सहकाऱ्यांना बरोबर घेऊन ग्रामपंचायतीचा विकास करणार आहे. विकास कामात कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता विकास कामे चालू राहणार आहेत . लवकरच लोणी काळभोरची जलजीवन योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तरुण, अभ्यासू, होतकरू असे सरपंच लाभल्याने लोणी काळभोर गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण झाले.
मावळत्या सरपंच सविता गीताराम लांडगे यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणुक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. ग्रामविकास अधिकारी एस. एन. गवारी यांनी निवडणुक कामकाजात सहकार्य केले.
सरपंचपदासाठी भरत काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंदे यांनी त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी ज्येष्ठ नेते माधव काळभोर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच भरत काळभोर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, पंचायत समिती माजी सभापती युगंधर उर्फ सनी काळभोर बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर, माजी सरपंच शरद काळभोर, योगेश काळभोर, भोलेनाथ शेलार, माधुरी काळभोर, उपसरपंच रतन वाळके, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, संगीता काळभोर, सदस्य नागेश काळभोर, गणेश कांबळे, संजय राखपसरे उपस्थित होते.



