लोणी काळभोर, कदमवाकवस्ती वाहतूक कोंडीचा प्रचंड संताप, रुग्णवाहिका ही अडकल्या, सहा ते सात किलोमीटर दुतर्फा रांगा ; पुणेकरांचे प्रचंड हाल..!संजय सुर्वे ACP वाहतूक शाखा, पुणे यांची प्रतिक्रिया… !
संजय सुर्वे ACP वाहतूक शाखा, पुणे यांची प्रतिक्रिया... व नागरिकांच्या प्रतिक्रिया पहा व्हिडिओ...

पुणे (हवेली) : पुणे शहरात सध्या वाढत्या वाहतूक कोंडीचा विचार करता अत्यावशयक सेवा वगळता जड वाहनाना सकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत प्रवेश बंदी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिले आहेत.
पुणे शहर वाहतूक शाखेची हद्द नायगाव पासून सुरू, कवडीपाट येथे प्रवेश बंदी कोणासाठी?
संबधित वाहतूक शाखेच्या वरिष्ठाच्या आदेशानुसार नायगाव येथुन हद्द असताना पुणे सोलापूर महामार्गावर कवडीपाट येथे जड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली. परंतु नायगाव येथुन कवडीपाट अंदाजे दहा ते बारा किलोमीटर शहराच्या आत येत असताना कोणाच्या सेवेसाठी कवडीपाट येथे प्रवेश बंदी करण्यात आली असा प्रश्न पडुन प्रचंड संतापाची लाट नागरिकांमधून येत आहे.
पुणे शहर वाहतूक शाखेची हद्द नायगाव या ठिकाणी सुरु होत असताना ही संबंधित वाहतूक शाखेने जास्त लोकवस्ती शहाराजवळ असणाऱ्या कदमवाकवस्ती येथे राष्ट्रीय महामार्गावर डायवरसेशन चालू केल्याने हायवेवरील वाहतूक प्रवासी, नागरिकांना व पुणेकरांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. स्थानिक पातळीवर वाहतूक पोलीस प्रशासनावर नागरिकांचा व वाहन चालकांचा प्रचंड संताप पुणेकर ट्रॅफिक मध्ये अडकले जवळपास चार तास अडकल्याने पोलीसांत व चालकांत तुरळक वादाचे प्रसंग ही झाले.
“अत्यावश्यक सेवेतील रुग्ण वाहिका अडकल्या जवळपास एक तासाहून अधिक काळ”
साहेब अत्यावशयक सेवेतील वाहणांना तरी सोड” अशी नागरिकांची आर्त हाक, रुग्णवाहीका अडकल्या आहेत रुग्णास काही झाल्या जबाबदार कोण?दूध, भाजीपाला यांना जवळपास पाच सात किलोमीटर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला ‘हडपसर वरून लोणी काळभोर च्या दिशेने अवजड वाहने येतातच कशी. कोणाच्या आशीर्वादाने, प्रवेश बंदीचा आदेश असताना कर्तव्यात बेजबाबदार पणा उघडपणे दिसत असून संबंधित अधिकारी यांच्या वर शिस्तभंगाची कारवाई होणार का? स्थानिक नागरिकांचा पोलीस प्रशासनाला प्रश्न…
पुणे शहर वाहतूक शाखेची खरी हद्द नायगाव येथून चालू परंतु कवडीपाट टोल नाक्यावर वाहतूक वळवण्याचा घाट कशासाठी? कोणासाठी? अचानक या आदेशाने वाहन चालकांमध्ये प्रचंड गोंधळ झाला.
हडपसर कडून येणाऱ्या जड वाहणामुळे वाहतूक कोंडी प्रचंड वाढली. जड वाहणांना शहरात प्रवेश बंदी असताना हडपसर वरून जड वाहने येतात कशी..? त्या जड वाहनांना कोणाचा आदेश मिळतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. हडपसर वाहतूक शाखाचे अधिकारी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत. नाहीत का असा सवाल सामान्य नागरिकांमध्ये उठताना दिसत आहे.
संजय सुर्वे ACP वाहतूक शाखा, पुणे यांची प्रतिक्रिया…
…नागरीकाची प्रतिक्रिया…




