क्राईम न्युजमहाराष्ट्र

अपघात नव्हे घातपात ; वाचा सविस्तर… नाहक चार जणांचा दुर्दैवी अंत. ; हिंजवडी…

पुणे : हिंजवडीतील फेज दोन येथील कंपनी जवळ ५०० मीटर वर धावत्या बसला आग लागली. यामध्ये चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त झाली.

मात्र ही घटना घातपात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. गाडीचा चालक जनार्दन हंबर्डीकरने पोलिसांना सगळं सांगितलं.

                          …अपघात नसून घातपात… 

बसने पेट घेतल्यानं ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी अवघ्या काही मिनिटांमध्ये अवघ्या राज्यात पसरली. आधी हा अपघात असल्याचं बोललं जात होतं. पोलिसांकडून देखील शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचं सांगितलं जात होतं.

                       …पोलिसांनी जनार्दनचा डाव केला उध्वस्त..

पोलिसांनी त्यांची तपासाची चक्र फिरवली आणि हा घातपात असल्याचं समोर आलं. घटनास्थळी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, पोलीस निरीक्षक कन्हैय्या थोरात यांच्यासह आरटीओ चे अधिकारी यांनी धाव घेतली होती. जळालेल्या बसमध्ये नेमकं असं काय झालं की काही सेकंदामध्ये एवढी भीषण आग लागली याचा तपास सुरु झाला. याच तपासामध्ये आणि कामगारांच्या आणि जखमी असलेल्या जनार्दन हंबर्डीकरांच्या चौकशीमध्येच भलतंच काही समोर आलं.

                            …गाडीचा चालक जनार्दन कोण?… 

आरोपी जनार्दन हंबर्डीकर हा २००६ पासून याच कंपनी मध्ये काम करतो. त्याच्याबरोबर या कंपनीमध्ये एकूण पंचेचाळीस कामगार काम करतात. ही कंपनी आधी पुण्यामध्ये कार्यरत होती. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये आली आहे. याच कंपनीचे कामगार बसमधून प्रवास करत होते. त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे.

जनार्दन हंबर्डीकर याला कामगार त्रास देत होते. त्याचबरोबर दिवाळीमध्ये त्याला बोनस देखील मिळाला नव्हता. पगाराबाबतही त्याला वारंवार अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याच्या मनात राग होता. बुधवारी ही घटना घडण्यापूर्वी मंगळवारी त्यानं प्लॅन केला. यामध्ये त्यानं अगदी याच कंपनीमध्ये स्वच्छतेसाठी वापरलं जाणारं जे केमिकल आहे ते घेऊन कट रचला.

            …जनार्दन’ ड्रायव्हरने बस कशी पेटवली, इनसाईड स्टोरी….

पुण्यातून १४ कामगार घेऊन निघाल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हल्स हिंजवडीतील फेज वनमध्ये म्हणजे अगदी या कंपनीच्या पाचशे मीटरवर आली. कट रचल्याप्रमाणे अगदी जवळ आल्यानंतर माचीसनं सिटखालच्या केमिकल टाकलेली चिंध्या, कापडं पेटवली. त्यानं असं भासवलं की की हा अपघात आहे आणि शॉर्ट सर्किटमुळं झालेला आहे. मात्र अगदी शंभर मिटरपर्यंत पेटलेली बस पुढे जात राहिली. आरोपी आहे जनार्दन हंबर्डीकर यानं बाहेर उडी घेतली आणि त्यानंतर एक एक जण उडी मारून बाहेर पडत होते. काही जणांनी खिडकी तोडून स्वतःचा जीव वाचवला. मात्र, चार जण आहेत पाठीमागे बसलेले असल्यानं त्यांना कळायच्या आत ते धुरामुळे गुदमरून गेले. दरवाजा उघडणं अशक्य झालं. तो दरवाजा उघडला नाही आणि त्यामुळेच त्यांचा होरपळून या आगीमध्ये मृत्यू झालेला आहे.

                           …दिवाळीला बोनस दिला नव्हता म्हणून…

“मला दिवाळीमध्ये बोनस दिला नव्हता” असं देखील जनार्दनने पोलिसांच्या जबाबात कबूल केलेलं आहे. त्यातूनच हा प्रकार केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. हिंजवडीमध्ये ही आयटी हब आहे. या आईटी हब मध्ये अगदी रस्त्यावर, कंपनीमध्ये अनेक सीसीटीव्ही लावलेले आहेत. या सीसीटीव्ही मध्येच वेगवेगळ्या अंगलने ही घटना कैद झाली होती.

पोलिसांच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की शॉर्ट सर्किट लागल्यानंतर अगदी काही वेळातच एवढी भीषण आग लागू शकत नाही. त्यानंतर पोलिसांनी तपास केला आणि त्यामध्ये, हा घातपात असल्याचं उघड झालेलं आहे. सध्या अ जनार्दन हंबर्डीकर याच्यावरती हिंजवडी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या त्याच्यावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. खरं तर या घटनेमध्ये चार जणांचा हकनाक बळी गेलेला आहे. कारण जनार्दन हंबर्डीकर याला त्रास देणारे जे आहेत ती तीन व्यक्ती वेगळ्या आहेत. ते या घटनेत बचावलेले आहेत. दरम्यान, सहा जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??