दोन जुगार अड्ड्यांवर कारवाई, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांची दमदार कामगिरी ; लोणी काळभोर…

पुणे (हवेली) : लोणी काळभोर परिसरातील कदमवाक वस्तीसह थेऊर जवळील तुपे वस्तीजवळ दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
दोन्ही कारवाईत चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून रोकडसह ८४ हजारांचे जुगार साहित्य जप्त केले आहे.
राजेभाऊ शेषराव मुसळे (वय ४० रा. थेऊरगाव, हवेली), राम राजेंद्र गिरे (वय ३६ रा. कुंजीरवाडी, हवेली) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ६० हजारांची रोकड, जुगाराचे साहित्य असा ८२ हजार ५८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. आरोपी झुडपात जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच, पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
कदमवाक वस्तीनजीक लोणी स्टेशनजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दत्तात्रेय नवनाथ मोहोळकर (वय ५१, रा. म्हातोबा आळंदी, हवेली) आणि तात्याराम महादेव ससाणे (वय ५१, रा. लोणी काळभोर) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, उपनिरीक्षक बोबडे, दिगंबर सोनटक्के, महेश चव्हाण, रवी आहेर, मल्हार ढमढेरे, मंगेश नानापुरे आणि संदीप धुमाळ यांनी ही कारवाई केली.



