मांजरी खुर्द येथे सरपंच नसल्याने दिव्यांगाचा निधी रखडला ; दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय ननवरे..

पुणे (हडपसर) : मांजरी खुर्द येथे सरपंच नसल्याने ३७ दिव्यांग बांधव दिव्यांग निधी पासून वंचित!
आठ दिवसांचे आत दिव्यांग निधीचे वाटप करा अन्यथा जनाधार दिव्यांग संस्थेच्या वतीने मांजरी खुर्द ग्रामपंचायत समोर आंदोलन केले जाईल असे निवेदन ग्रामसेवक मयुर रामचंद्र उगले यांना देण्यात आले.
या संबंधित ग्रामसेवकांना दिव्यांग निधी का वाटला नाही याची विचारणा केली असता सध्या सरपंच पद नसल्याने सहीचे अधिकार कोणाला नाही. असे सांगितले परंतु दिव्यांग बांधवांना वंचित ठेवू नका दिव्यांग निधीचे वाटप करण्याचे अधिकार प्रशासनाला असतात. याची त्यांना जाणीव करून दिली तसेच ग्रामसभा असल्याने ग्रामसभा प्रोसिडिंगमध्ये दिव्यांग निधीचे वाटप करावे अशी नोंद केली.
यासंबंधी गटविकास अधिकारी यांच्याकडे, भेटून लेखी तक्रार केली जाईल असे सांगितले प्रसंगी, जनाधार दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय ननवरे, अमोल हंकारे, सुनिता शिंगारे, कविता ढेरे, रामदास शिंगारे, आशाबाई म्हात्रे इत्यादी उपस्थित होते.



