शिक्षण
कै. सौ. विमलाबाई नेर्लेकर विद्यालय खडकवाडी येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन..मुख्याध्यापक भरत पवार

पुणे (हवेली) : (दि.२ फ्रेबुवारी) एनडीए खडकवासला धरण क्षेत्रात असलेले ग्रामीण भागातील विदयालय कै. सौ. विमलाबाई नेर्लेकर विद्यालय खडकवाडी येथे १०० विद्यार्थ्यांनी सकाळ चित्रकला स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या प्रसंगी कला शिक्षक संजयकुमार जगताप, क्रिडा शिक्षक श्रीराम सरपाले, मच्छिंद्र घनकुटे, जेष्ट शिक्षक सुरेश थोरात, नवनाथ डिंबळे, अक्षय तागुंदे महाराज, बाळू रायकर, एकनाथ जाधव, अनिल देशमुख हे उपस्थित होते. मुख्याध्यापक भरत पवार यांनी या स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.
संस्थेचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती हवेली चे उपसभापती दत्ताभाऊ पायगुडे, सचिव रवींद्रजी नेर्लेकर, संचालक यशवंतराव तागुंदे, लक्ष्मणराव माताळे यांनी विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा -र्यांचे कौतुक केले.



