जिल्हाशिक्षण

शाळेची होणार चौकशी ; जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांनी नेमली समिती.. वाचा सविस्तर…

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (एसएससी बोर्ड) मान्यता घेऊन शाळा चालविणार्‍या लोहगावमधील एका शिक्षण संस्थेच्या शाळेत सीबीएसई अभ्यासक्रमच शिकविले जात असल्याचे उघडकीस आले आहे.

चौकशीसाठी जिल्हा परिषदेने समिती नेमली आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.

लोहगावच्या शिक्षण संस्थेची चौकशी करण्याबाबत एका समितीची नियुक्ती करण्यात आली. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्या संस्थेविरोधात काय कारवाई करायची, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.

अशा शिक्षण संस्थांची झाडाझडती घेण्यासाठी लवकरच त्यांची तपासणी केली जाणार आहे. शिक्षण मंडळाची मान्यता असलेल्या शाळा सीबीएसई बोर्डाचे अभ्यासक्रम शिकवत असल्याचे समोर आले आहे. त्याद्वारे पालकांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे.

लोहगावमधील एका संस्थेच्या शाळेला एसएससी बोर्डाची मान्यता आहे. तसेच, सीबीएसई बोर्डाची मान्यता नाही. त्यामुळे त्या शाळेत पालकांनी सीबीएसई बोर्डासाठी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे. सीबीएसई बोर्डाची जाहिरात करून पालकांना फसवणार्‍या शाळांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

पुणे जिल्ह्यात आणखीन किती बोगस शाळा ?

पुणे शहर जिल्ह्यातील अनेक शाळांना राज्य शिक्षण मंडळाची मान्यता आहे. मात्र, त्यापैकी काही शाळा या सीबीएसई बोर्डाची जाहिरात करत आहेत. कोणत्याही शाळेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्या शाळेला कोणत्या बोर्डाची मान्यता आहे.

आणखीन शाळा यात अडकण्याची शक्यता..

त्या ठिकाणी कोणता अभ्यासक्रम शिकवला जातो, याची पालकांनी खातरजमा करावी. यापुढे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह हवेली, मुळशी, खेड तालुक्यांतील सर्व शाळांची विशेष पथक व क्षेत्रीय अधिकार्‍यांमार्फत मान्यता तपासली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??