महाराष्ट्र

आयपीएस पठारेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ! लेखा परीक्षक ते पोलिस उपायुक्त.. ‘असा’ होता कार्यकाळ…

अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील भूमिपुत्र व मुंबईतील आयपीएस अधिकारी सुधाकर भानुदास पठारे (वय ५० वर्षे ) यांचे शनिवारी तेलंगणामधून परतताना अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने वाळवणे गावावर शोककळा पसरली असून सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत दुखवटा पाळला.

रविवारी (दि.३०) दुपारी वाळवणे येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पठारे हे प्रशिक्षणासाठी हैद्राबाद येथे गेले होते.

तेथे आपले नातेवाईक भागवत खोडके यांच्यासह जोतिर्लिंगच्या दर्शनासाठी जात आसताना त्यांच्या गाडीला मालमोटारीने समोरासमोर धडक दिली. त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला. घटना समजताच ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली. गावातील कोणत्याही सामाजिक कामात त्यांचा सहभाग असायचा. अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांनी अर्थिक सहकार्य केलेले आहे. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

सुधाकर पठारे यांचा सेवा प्रवास…

पठारे यांनी कृषी पदवी घेऊन शिक्षण घेतले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून १९९५ मधे ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. त्यांनतर त्यांची विक्रिकर अधिकारी वर्ग १ म्हणून निवड झाली. १९९८ मध्ये पोलिस उपाधिकारी झाले. त्यानंतर पोलिस खात्यात चांगली कामगिरी केली,नंतर ते पोलिस उपाधीक्षक म्हणून पंढरपूर,कोल्हापूर येथे सेवा केली. सध्या ते मुंबई बंदर परिमंडळाचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??